वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत सर्व पक्षांचा एकला चलो'चा नारा

वसई विरार महानगरपालिकेची गेल्या दीड वर्षा पासून रखडलेल्या निवडणुकीला आता मुहूर्त मिळणार आहे.
Vasai Virar Municipal Corporation
Vasai Virar Municipal Corporation

संदीप पंडित

विरार : वसई विरार महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळणार असून निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचना जाहीर झाल्याने साऱ्याच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात असली तरी वसई विरारमध्ये मात्र महाविकास आघाडीतील (Mahavikas aghadi) पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. यात सर्वात अगोदर काँग्रेसने (Congress) एकला चालोचा नारा दिल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीने (NCP) ही एकला चालो'चा नारा दिला आहे. दुसऱ्या बाजूला भाजप आणि सत्तारूढ बविआ सुद्धा स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याने या ठिकाणी पंचरंगी सामना रंगण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वसई विरार महानगरपालिकेची गेल्या दीड वर्षा पासून रखडलेल्या निवडणुकीला आता मुहूर्त मिळणार आहे. 15 मे पूर्वी येथील निवडणूक घेण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरु केली असून 126 जगासाठी 42 प्रभागाची रचना केली आहे. या प्रभाग रचनेवर काल हरकती घेण्याच्या शेवटच्या दिवशी 79 हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. निवडणुकीची तयारी सुरु झाल्याने आता राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली असून सद्या तरी सारेच पक्ष हे एकला चलोच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहेत. एकला चलोच्या नाऱ्याचा फायदा सत्तारूढ बहुजन विकास आघाडीला होणार असल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

Vasai Virar Municipal Corporation
'सौ सुनार की एक लुहार की...!' संजय राऊत पत्रकार परिषदेत काय बोलणार?

गेल्यावेळी पालिकेत असलेल्या 115 जागा पैकी शिवसेनेला 5,भाजप 1, मनसे 1 आणि बहुजन विकास आघाडीला 108 जागा मिळाल्या होत्या,तर दोन्ही काँग्रेसने आपले खातेही उघडलेले नव्हते. असे असले तरी निवडणुकी पूर्वी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सगळेच जण पालिकेवर आपला झेंडा फडकविण्याच्या वलग्ना करत आहेत. भाजपला गेल्या निवडणुकीत १ जागा मिळाली होती. ती जागा सुद्धा भाजपची पेक्षा किरण भोईर यांनी आपल्या कामाच्या जोरावर जिंकली होती. आता तर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि कपिल पाटील हे मात्र बविआचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या मांडीला मंडी लावून बसतात तर संपर्क नेते प्रसाद लाड बविआच्या विरोधात भूमिका घेताना दिसत नसल्याने भाजपमध्ये निवडणुकीची रणनीती ठरल्याचे दिसत नाही.

दोन्ही काँग्रेसची ताकद मर्यादित राहिल्याने त्यांची एकहाती सत्ता पालिकेवर येऊ शकत नाही तर शिवसेनेत असलेल्या गटातटाच्या राजकारणाने आणि स्थानिक जिल्हाप्रमुख नसल्याने त्यांची सगळी मदार हि ठाण्यावर अवलंबुन असल्याने ते इतिहाती सत्ता आणू शकत नाहीत हि वस्तुस्थिती असल्याने जसजसा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल तशी युतीच पदर उलगडले जाणार आहेत. सद्या तरी सर्वच पक्ष हे एकला चलोच्या मूड मध्ये असल्याचे चित्र दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com