राज्यातील सर्वच मंत्री करोडपती : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह 15 मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे

राज्यातील सर्व 20 मंत्री करोडपती असून या मंत्र्यांच्या मालमत्तेची सरासरी 47 कोटी रुपये होते.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Gov. : राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार सत्तेत येऊन सव्वा महिना झाला आहे. आतापर्यंत राज्यातील 20 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मंत्रीमंडळातील या 20 मंत्र्यांचे शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्ता या बाबतचा संक्षिप्त अहवाल असोसिएशन फॉर डिमोक्रेटिक रिफार्म अॅण्ड महाराष्ट्र इलेक्शन वॉच ( एडीआर ) या संस्थेने तयार केली आहे. या अहवालात राज्यातील सर्व 20 मंत्री करोडपती असून या मंत्र्यांच्या मालमत्तेची सरासरी 47 कोटी रुपये होते.

राज्याच्या मंत्रीमंडळात 20 मंत्री आहेत. त्यातील 10 मंत्री भाजपचे तर 10 मंत्री शिंदे गटाचे आहेत. या अहवालानुसार राज्यातील 75 टक्के म्हणजे 15 मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यातील 13 मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. भाजपच्या 8 मंत्र्यांविरोधात फौजदारी त्यात 6 मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत. शिंदे गटातील 7 मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल असून हे सर्व गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
NCP Vs Pichad : श्रीकांत शिंदे म्हणाले, शरद पवारांवर टीका म्हणजे पिचडांचा सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 18 फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यात एक गुन्हा गंभीर फौजदारी स्वरूपाचा आहे. त्याखालोखाल तानाजी सावंतांवर 11, विजयकुमार गावित व संदीपान भुमरे यांच्यावर प्रत्येकी 9 गुन्हे दाखल आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वादग्रस्त ठरत असलेले संजय राठोड या दोघांवरही प्रत्येकी 4 गुन्हे दाखल आहेत.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Dada Bhuse: एकनाथ शिंदे यांनी दादा भुसेंना दिले मैत्रीचे गिफ्ट!

मालमत्तेत भाजपचे मंत्री आघाडीवर आहेत. त्यांची सरासरी मालमत्ता 58 कोटी रुपयांची आहे. तर शिंदे गटाची सरासरी मालमत्ता 36 कोटी रुपयांची आहे. या मंत्र्यांत सर्वाधिक मालमत्ता भाजपच्या मंगलप्रभात लोढा ( 441 कोटी ) यांची आहे. तर सर्वात कमी मालमत्ता संदीपान भुमरे ( 2 कोटी ) यांची आहे. मुख्यमंत्री शिंदेंकडे 11 कोटींची तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे 8 कोटींची मालमत्ता आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
मंत्र्यांचे सर्व अधिकार खात्याच्या सचिवांना? : CM एकनाथ शिंदे यांचे मोठे स्पष्टीकरण

शिक्षणाबाबत मात्र या मंत्रीमंडळाची स्थिती चांगली आहे. 8 मंत्र्यांनी 10 वी, 12वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. एक मंत्र्यांने पद्विका प्राप्त केली आहे. तर 11 मंत्री पदवीधर आहेत. एडीआरने तयार केलेला हा अहवालाला या मंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com