महाविकास आघाडीच्या आमदारांची मते फुटणार नाहीतच... प्रफुल्ल पटेलांनी सांगितले कारण

आम्हाला साथ देणाऱ्या आमदारांशी MLAs चर्चा करूनच शिवसेनेने Shiv sena दुसरा उमेदवार दिलेला आहे, असेही श्री. पटेल Prafull patel म्हणाले.
महाविकास आघाडीच्या आमदारांची मते फुटणार नाहीतच... प्रफुल्ल पटेलांनी सांगितले कारण
Praful Patelsarkarnama

मुंबई : महाविकास आघाडीतील तीनही मित्रपक्षांची मते तसेच या तीनही पक्षांना मानणारे विधानसभा सदस्य आहेत. त्याचा हिशोब केला तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येण्यात कोणतीही अडचण नाही. आमच्या तीनही पक्षांच्या आमदारांना दाखवून मते द्यावी लागणार आहेत. आमच्या आघाडीतील तीनही पक्षांचे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, अशा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे.

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रफुल्ल पटेल म्हणाले,मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक सदस्य असून यापूर्वी काँग्रेस पक्षातही खासदार शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली आहे. चार वेळा महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलो आहे. राज्यसभेची दोन टर्म झाली आहे. हे माझे ३२ वे वर्षे असून महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने व पक्षाच्या नेत्यांच्या सहकार्याने मी कार्यरत आहे. पुढील सहा वर्षेही देशाच्या व राज्याच्या हितासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.

Praful Patel
आता पटोलेंवर बोलण्याची माझी मुळीच इच्छा नाही : प्रफुल्ल पटेल

विजयाचे गणित मांडताना श्री. पटेल म्हणाले, सहज विचार केला तर महाविकास आघाडीतील तीनही मित्रपक्षांची मते सोबत या तीनही पक्षांना मानणारे अपक्ष विधानसभा सदस्य आहेत. त्याचा हिशोब केला महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येण्यात कोणतीही अडचण नाही. मतदान असेल, राष्ट्रीय व अधिकृत पक्ष असतील आमच्या तीनही आमदारांना दाखवून मते द्यावी लागणार आहेत. तीनही पक्षांचे संख्याबळ पाहून मला खात्री आहे, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील.

Praful Patel
शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार : संभाजीराजेंना अजूनही आशा..

नवाब मलिक व अनिल देशमुख कोठडीत आहेत. त्यांच्या मतदानाविषयी काय निर्णय घेतला जाणार आहे, यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, ते दोघे तुरूंगात असले तरी न्यायालयात अर्ज करून मतदान करण्यासाठी येण्याची परवानगी त्यांना मिळू शकते. त्यामुळे त्याची आम्ही कारवाई करणार आहेत. शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराविषयी विचारले असता ते म्हणाले, काही दिवस अगोदर मुख्यमंत्री, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी चर्चा केली होती. तीन पक्षाच्या आमदारांशी चर्चा करून आज शिवसेनेचा दुसरा व आघाडीचा चौथा उमेदवार दिलेले आहे. आम्हाला साथ देणाऱ्या आमदारांशी चर्चा करून शिवसेनेने दुसरा उमेदवार दिलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in