NCP, Shivsena Agitation
NCP, Shivsena Agitationsarkarnama

50 खोके, सगळं OK, या घोषणेने बंडखोर अस्वस्थ! जशास तसे उत्तराची तयारी!

बंडखोरांना डिवचण्यात defeating the rebels शिवसेनेपेक्षा Shivsena राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP MLAs आमदार आघाडीवर असल्याचे दिसले.

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकारला सत्तेतून बाहेर काढल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि बंडखोरांविरोधात आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने अधिवेशनातही शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आपला आवाज बुलंद केला. आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पायऱ्यांवर येताच विरोधकांनी 'आले रे आले, गद्दार आले, '५० खोके सगळे ओके,' असे हिणवून विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला.

या साऱ्या प्रकारानंतर विरोधकांना जशास तसे उत्तर द्या, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना दिला. पावसाळी अधिवेशनात विरोधकांची आक्रमकता लक्षात घेता मुख्यमंत्री यांनीही आता प्रातिउत्तर देण्याची तयारी चालवली आहे. संजय बांगर प्रकरणाबाबत आपल्या आमदारांशी बोलताना हाणामारी ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे असे प्रकार पुढे होऊ देऊ नका, अशी सूचना शिंदे यांनी दिली. सरकार काय काम करत आहे हे लोकांपर्यंत पोहचवा, असाही सल्ला शिंदे यांनी दिला.

अधिवेशन भरण्याआधीच विधानभवनाच्या आवारातील राजकीय माहोल तापल्याचे दिसून आले. सत्ताधारी विरोधकांमधील पहिलीच खडाखडी ही अधिवेशनातील संघर्षाचे संकेत ठरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यापुढे विरोधक प्रचंड आक्रमक होऊन सत्ताधारी गटाचे आमदार मात्र, शांतपणे निघून गेले.

NCP, Shivsena Agitation
पावसाळी अधिवेशन : शिंदे फडणवीसांची पहिली कसोटी

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून प्रारंभ झाला. त्याआधीच सभागृहाबाहेरच सत्ताधारी-विरोधकांच जुपली. शिंदे-फडणवीस सरकार फसवे असल्याचा आरोप करीत, अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधक आंदोलनात उतरले. ते सकाळी साडेदहा पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणा देत असतानाच आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि त्यांचे मंत्री आमदार इमारतीतून पायऱ्यांवर आले.

NCP, Shivsena Agitation
Uddhav Thackeray यांच्या डोळ्यात डोळे घालून एकनाथ शिंदे बघणार?

त्यांना पाहताच विरोधकांनी विशेषत: बंडखोरांना 'टार्गेट' करीत 'गद्दार' म्हणून हिणवले. त्यापलीकडे जाऊन ५० खोके, सगळे ओके' अशी जोरजोरात घोषणाबाजी करीत, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अक्षरशः घेरले. त्यामुळे विधान भवनाच्या आवारात प्रचंड गोंधळ उडाला. मात्र, हा गोंधळ वाढत असतानाच पायऱ्यांवरून वाट काढत शिंदे-फडणवीस हे शिवाजी महाराज यांच्याकडे पुतळ्याकडे गेले. तिथे मात्र, सत्ताधाऱ्यांनी घोषणा दिल्या.

NCP, Shivsena Agitation
NCP-BJP|कमानीवरुन वाद; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

बंडापासून गद्दार शब्दाची 'अॅलर्जी' असलेल्या बंडखोरांना पाहून आंदोलनकर्त्यांनी 'गद्दार' असा उल्लेख केला. बंडखोरांना डिवचण्यात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आघाडीवर असल्याचे दिसले. त्यात बंडखोर आमदारही संतप्त झाल्याने अधिवेशन काळात सत्ताधारी विरोधकांत नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com