Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होणार; गिरीश महाजन यांच्या पीएने लावली १ लाखांची पैज

Girish Mahajan | BJP : राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारले आव्हान

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तिन्ही उमेदवार विजयी होणार असा दावा पक्षाच्या सर्वच नेत्यांकडून केला जात आहे. आता या दाव्यामध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनीही उडी घेतली आहे. देशमुख यांनी फक्त उडीच घेतलेली नाही, तर त्यांनी १ लाख रुपयांची पैजही लावली आहे आणि ती स्वीकारण्याचं खुलं आव्हानही त्यांनी दिले आहे.

देशमुख यांनी दिलेले हे आव्हान कोणं स्वीकारणार? अशी चर्चा होती. त्यानंतर देशमुख यांचे हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वीकारण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल पाटील यांने देशमुख यांचे आव्हान स्वीकारले आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणारचं असा दावा केला आहे. त्यामुळे ही एक लाख रुपयांची शर्यत कोण जिंकणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. (Rajya Sabha Election Latest News)

दरम्यान संध्याकाळी ४ वाजता राज्यसभेसाठीचे मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरु होण्यापूर्वी भाजपने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे.

या तीन आमदारांनी आपल्या मतपत्रिका मतदान करण्याआधी आपल्या पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधी व्यतिरिक्त इतरांना जाहीरपणे दाखविल्या, त्यामुळे यांची मते संपूर्ण बाद करावीत अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केली आहे. सुरुवातीला राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपने घेतलेला हा आक्षेप फेटाळून लावला आहे. मात्र त्यावर भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अपिल केले. त्यामुळे त्यावर निर्णय होईपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. (Rajya Sabha Election 2022 News)

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाळ व पक्षनेते ओम पाठक यांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच तळ ठोकून बसले आहे. भाजपच्या या तक्रारीची दखल घेत आयोगाने तिघांच्या मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरण तसेच निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवाल मागवून घेतले आहे. त्यामुळे आघाडी सरकार निवडणूक आयोग काय निकाल देते याकडे डोळे लावून बसली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com