मुनगंटीवारांच्या 'वंदे मातरम्' बोलण्याच्या घोषणेबाबत अजितदादा सभागृहात प्रश्न विचारणार

Ajit Pawar : ठाकरे सरकार असताना त्यावेळेस जय महाराष्ट्र हे फोन केल्यावर वापरले जायचे.
Sudhir Mungantiwar-Ajit Pawar Latest News
Sudhir Mungantiwar-Ajit Pawar Latest Newssarkarnama

मुंबई : राज्य सरकारमधील मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांचं खातेवाटप काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केलं आहे. आपल्या खात्याचा पदभार स्विकारताच भाजप नेते सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राज्यातील शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी आता 'वंदे मातरम्' ने संभाषणाला होणार सुरुवात करण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, या त्यांच्या घोषणेवर विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वंदे मातरम् कशासाठी वापरले जात आहे हे आम्ही सरकारला सभागृहात विचारू आणि जर योग्य असेल तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. (Sudhir Mungantiwar-Ajit Pawar Latest News)

Sudhir Mungantiwar-Ajit Pawar Latest News
सावंतांना निंबाळकर अन् कैलास पाटलांशी संघर्ष करून आरोग्यसेवेचा शिवधनुष्य पेलावा लागणार

हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृतमहोत्‍सवी वर्ष असल्याने या वर्षाचे औचित्‍य साधत यापूढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्‍याचे नवे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे. यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सांस्कृतिक मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी वंदे मातरम् बोलण्यासाठी घोषणा केली आहे. पण उद्धव ठाकरे सरकार असताना त्यावेळेस जय महाराष्ट्र हे फोन केल्यावरती वापरले जायचं. पण नवीन सरकार आल्यानंतर आता वंदे मातरम् बोलले जात आहे. याबाबत आम्ही सभागृहात विचारू की वंदे मातरम् कशासाठी वापरले जात आहे. जर योग्य असेल तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Sudhir Mungantiwar-Ajit Pawar Latest News
घराणेशाहीमुळे देशातील गुणवत्तेचे नुकसान? अजित पवारांचे पंतप्रधानांना उत्तर....

दरम्यान, नव्या सरकारच्या मंत्री मंडळाचे खातेवाटप काल जाहीर झाले. यामध्ये सांस्‍कृतिक खात्‍याची जवाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देण्यात आली होती. यामळे त्यांनी स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पुर्वसंध्‍येलाच ही घोषणा केली आहे. वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसुन भारतीयांच्‍या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे.

१८७५ मध्‍ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍याकाळात स्‍वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्‍याचं काम करत होते. 'हे माते मी तुला प्रणाम करतो', अशी भावना व्‍यक्‍त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लींग चेतविले.भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्‍या या रचनेतील एकेक शब्‍द उच्‍चारताच देशभक्‍तीची भावना जागृत होते. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापूढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरु करणार आहोत.

Sudhir Mungantiwar-Ajit Pawar Latest News
विखे पाटील आता हेवीवेट मंत्री : भाजपमध्ये वजन वाढले

१८०० साली टेलिफोन अस्‍तीत्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो (Hello) या शब्‍दाने संभाषण सुरु करतोय. मात्र आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय मुनगंटीवारांनी जाहीर केला आहे. सांस्‍कृतिक कार्या विभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्‍यात येईल,असेही मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. मात्र ठाकरे सरकार असतांना जय महाराष्ट्र अस बोललं जात होत. त्याऐवजी वन्दे मातरम् म्हणायचा निर्णय या सरकारने घेतल्याने पवार हे याबाबतचा सवाल आता सभागृहात काय विचारतात हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com