Ajit Pawar News : वर्षानुवर्षे प्रलंबित 'या' मुद्द्यावर अजित पवारांचं राज्य सरकारला पत्र; कारण काय?

Letter to State Government : अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्राला भेट देण्याची केंद्राकडे केली मागणी
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar's Letter : आता १ मे रोजी आपण महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापनदिन साजरा करणार आहोत. या दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रयत्न करावेत, अशा मागणीचे एक भलेमोठे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला दिले आहे. त्यात त्यांनी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राला अमृतकाळातील भेट द्यावी, अशीही मागणी केली आहे.

Ajit Pawar
Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांची शिष्टाई; अकोले ते लोणी शेतकऱ्यांचा लाँग मार्च संगमनेरला स्थगित

या पत्रात मारठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत यापूर्वीच्या सरकारने केलेल्या प्रयत्नांचीही माहिती पवार यांनी दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "२०१२ मध्ये आमच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. समितीने विविध बाबींचा सखोल अभ्यास करून अहवाल तयार केला. त्यानंतर महाराष्ट्राच्यावतीने २०१३ मध्ये मराठी भाषा अभिजात दर्जाबाबत सर्व निकष पूर्ण करते त्या पुराव्यांसह अंतरिम अहवाल सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठविला होता. त्यानंतर २०१४ मध्ये अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारकडे पाठविला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेही याबाबत पाठपुरावा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची आग्रही मागणी केली होती. त्यानंतर २०२२ मध्ये तत्कालीन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांची भेट घेतली."

Ajit Pawar
Mallikarjun Kharge On Modi : 'पंतप्रधान मोदी म्हणजे विषारी साप'; वादानंतर खर्गेंनी घेतला 'यू टर्न..'

या पत्रात मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी दहा वर्षांपासून प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याची खंतही पवार यांनी व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, "एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी साहित्य अकादमीच्या अध्यक्षांच्या अखत्यारीत एक समिती स्थापन केली आहे. या समितीने तयार केलेल्या निकषांनुसार तमिळ, संस्कृत, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठीही अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करीत आहे. दरम्यान, साहित्य अकादमीने अहवालाच्या सखोल चिकित्सेनंतर मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने २०१४ पासून पाठपुरवा करुनही प्रयत्नांना यश आले नाही."

Ajit Pawar
Parbhani APMC Election : नेत्यांनी ताकद लावली, उद्या ठरणार मतदारांचा कौल..

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यावर फक्त केंद्र सरकारने शिक्कामोर्तब करणे गरजेचे आहे. आता अमृतमहोत्सवानिमित्त केंद्राने महाराष्ट्राला भेट देण्याची मागणीही पवार यांनी केली. अजित पवार म्हणाले, "अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करीत आहे. साहित्य अकादमी, सांस्कृतिक मंत्रालयापासून सर्वसंबंधित विभागांनी त्यासाठी सहमती दिलेली आहे. आता फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Government) त्यावर शिक्कामोर्तब करणे बाकी आहे. त्यामुळे केंद्रसरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राला अमृतकाळातील भेट द्यावी."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com