Sanjay Shirsat On Ajit Pawar: अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण,शिरसाटांचं मोठं विधान; म्हणाले...

Mahavikas Aaghadi Vajramooth Sabha: अजित पवार शरीराने महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत असतील मात्र...
Sanjay Shirsat On Ajit pawar
Sanjay Shirsat On Ajit pawarSarkarnama

Mumbai News: छत्रपती संभाजीनगर, नागपूरनंतर आता महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज (दि.१ मे) मुंबईतील बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेद्वारे ठाकरे गट आणि काँग्रेस हे दोन्हीही पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. या सभेवरुन शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)वर निशाणा साधला जात आहे. आता याचवेळी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अजित पवारांबद्दल मोठं विधान केलं आहे.

आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसह अजित पवारांविषयी खळबळजनक दावा केला आहे. शिरसाट म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनीही यापूर्वी त्या मैदानावर घेतल्या आहे. त्या सभांसोबत आजच्या सभेची बरोबरी करता येणार नाही. तर तीन पक्ष एकत्र येऊन गर्दी करतायत आणि आम्ही सोबत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत.

पण सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे ते कळत नाही. सभेमुळे वातावरण बदलते हा समज चुकीचा आहे. शिवसेनाप्रमुख मला म्हणायचे, गर्दी होते मग मतदान का मिळत नाही? त्यामुळं फार लक्ष द्यायची गरज नाही अशा शब्दांत शिरसाटांनी आघाडीला डिवचलं आहे.

Sanjay Shirsat On Ajit pawar
Gangapur APMC Result News : भाजप आमदार बंब यांनी मतदारसंघातील दोन्ही बाजार समित्या जिंकल्या..

याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी...

अजित पवार(Ajit Pawar) या सभांमध्ये मनापासून उपस्थित राहत नसून, त्यांचे मन कुठे आहे हे येणाऱ्या चार दिवसांत कळेल असं शिरसाट म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून अजित पवार भाजपसोबत जाणार का? या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. अजितदादा सगळे विषय हसून खेळून टोलवत आहे. याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे आणि ते निर्णय शंभर टक्के घेतील असंही शिरसाट म्हणाले.

तसेच या सभेत अजित पवार यांना आज सगळ्यात जास्त त्रास होत असेल. त्यांना सभेत खुर्ची आहे की, नाही माहित नाही. तसेच अजित पवार सभेत आले तर काय बोलणार माहीत नाही. पण या सभेत अजित पवार शरीराने असतील मात्र मनापासून सभेत नसणार आहे.

Sanjay Shirsat On Ajit pawar
Patan APMC Result : पाटणकरांना धक्का; पालकमंत्र्याच्या पॅनेलने ग्रामपंचायतीच्या चारही जागा जिंकल्या

अजितदादांच्या मनातलं येत्या चार दिवसांत कळेल...

अजित पवार या सभांमध्ये मनापासून उपस्थित राहत नसून, त्यांचे मन कुठे आहे हे येणाऱ्या चार दिवसांत कळेल असं शिरसाट म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून अजित पवार भाजपसोबत जाणार का? या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. अजितदादा सगळे विषय हसून खेळून टोलवत आहे. याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे आणि ते निर्णय शंभर टक्के घेतील असंही शिरसाट म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com