रायगड विकासासाठी अजित पवारांची मोठी घोषणा

रायगड किल्ला (Raigadh fort) व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाला निधी कमी पडू देणार नाही
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

मुंबई : रायगड किल्ला व परिसरातील विकासांच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) मोठी घोषणा केली आहे. रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणातील विकास कामांना गती मिळण्यासाठी पर्यटनविभाग, पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन यांनी समन्वय राखून प्राधिकरणाला कामकाजात सहकार्य करावे, या प्राधिकरणाला मंजूर असलेला यंदाच्या आर्थिक वर्षातील निधी शंभर टक्के वितरीत करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देतानाच या प्राधिकरणाला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले.

रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा अजित पवारांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाला निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या प्राधिकरणाच्या कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीला निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले. तसेच, या निधीचा विनियोग पालकमंत्री, जिल्हा प्रशासन आणि प्राधिकरणाने समन्वयाने करावा, अशी सूचनाही केली.

Ajit Pawar
कालीचरणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

राजमाता जिजाऊंचा वाडा, समाधीचे संवर्धन, जतन करण्याचे काम, शिवसृष्टी उभारणी अशी नियोजित सर्व कामे शास्रोक्त पद्धतीने करावीत. ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचे संवर्धन करावे, अशा सूचना अजित पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्यसरकार रायगड किल्ला आणि परिसर विकासाचे काम पूर्णत्वाला नेणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच रायगड किल्ला परिसरातील २१ गावांचा विकास आणि स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com