पोलिस उपायुक्तांना अजितदादा म्हणाले, 'थोडं बारीक व्हा..'

माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळाचीही आठवण अजित पवार यांनी काढली.
Ajit Pawar, dr kakasaheb dole
Ajit Pawar, dr kakasaheb dolesarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या सडेतोड अन् स्पष्ट स्वभावामुळे ओळखले जातात. त्यांचा प्रत्यय गुरुवारी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील एका कार्यक्रमात आला. एका पोलिस उपायुक्तांना अजितदादांनी प्रेमळ सल्ला दिल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक (Firefighter Bikes)आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक वितरण करण्यात आले. अजित पवार यांच्या हस्ते या वेळी या बाईकची चावी पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी त्यांनी हा सल्ला दिला. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते.

Ajit Pawar, dr kakasaheb dole
Rajya Sabha Election 2022: भाजप तिसरी जागा लढण्यावर ठाम, ऑफर नाकारली

पोलिस उपायुक्त डॅा. काकासाहेब डोळे (dr kakasaheb dole) हे अजित पवार यांच्याकडून बाईकची चावी घेण्यासाठी आले. डोळे यांच्या तब्येतीकडे पाहून अजितदादांनी त्यांना "बारीक व्हा..थोडं बारीक व्हा.." असा सल्ला दिला. डोळे हे काही प्रमाणात लठ्ठ आहेत.

Ajit Pawar, dr kakasaheb dole
Rajyasabha Election 2022 : धनंजय महाडिक यांची माघार?

माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळाचीही आठवण अजित पवार यांनी काढली. पोलिसांच्या तंदुरुस्तीविषयी आर आर पाटलांच्या काळात पोलिसांसाठी फिटनेस भत्ताही सुरु केला होता, अशी आठवण अजितदादांनी यावेळी सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com