Ajit Pawar on Budget: अर्रर्र...! अजितदादांची 'ती' अॅक्शन कॅमेऱ्यात कैद

Maharashtra Budget Session 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला.
Ajit Pawar on Maharashtra Budget Session
Ajit Pawar on Maharashtra Budget Session Sarkarnama

Maharashtra Budget 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी फडणवीसांनी विविध घोषणा केल्या. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे माध्यामांशी बोलतांनाचा अजित पवार यांचा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तेथे आले. उद्धव ठाकरे तेथे आल्यानंतर अजित पवार बाजूला झाले. अजित पवार, उद्धव ठाकरे यांना म्हणाले, 'तुम्ही बोला, मी तुमच्या बाजूलाच आहे'. ठाकरे बोलायला लागतांच पवारांनी तिथे उपस्थित असलेल्या आमदाराकडे पाहून डोळा मारला. अजित पवारांची ही अॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. उद्धव ठाकरे बोलतं असताना अजित पवारांनी डोळा मारला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, शिंदे- फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर बोलतांना, "अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. होतं नव्हतं ते जाहीर करा पुढचं पुढं बघू अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे," असे अजित पवार म्हणाले. वीज गॅस पाणीपुरवठा सेवा याकडे आजच्या अर्थसंकल्पात निधी नाही. तुकाराम महाराज यांच्या देहूसाठी काही घोषणा करतील असं वाटलं मात्र काहीचं केलं नाही. अरबी समुद्रातील शिवाजी महाराज स्मारक बाबत काहीचं घोषणा नाही, अशी टीका पवार यांनी केला. 

Ajit Pawar on Maharashtra Budget Session
Ajit Pawar On Budget: शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,हा अर्थसंकल्प म्हणजे...

" मी अर्थसंकल्प मांडला, विकासाच ‘पंचामृत’ यांनी मांडलं आहे. मुळात अमृत कोणी बघितला नाही. आधीच्या योजनांबाबत काय झालं विकास कामांवर निधी खर्च होतं नाही. काही जिल्ह्यात 4 टक्के 5 टक्के निधी खर्च झाला आहे. बजेचा खर्च पाहिला तर 51 टक्के खर्च झाला आहे. आता 20 दिवसांत उरलेला 50 टक्के निधी हे कसा खर्च करणार आहेत", असा सवाल पवार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com