Ajit Pawar News : अजितदादांचा दीड-दोन महिन्यांतच देवेंद्र फडणवीसांना ‘शाॅक’! नेमकं काय झालं?

Maharashtra Politics : "अर्थमंत्री या नात्याने निधी उपलब्ध करून देऊ शकतो"
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama

Mumbai Political News : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार चांगेलच आक्रमक झाले आहेत. त्यांनी कामांचा धडाका लावला आहे. अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या या बैठकांची जोरदार चर्चा रंगली आहे. यापूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याची बैठक घेतली होती. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला होता. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या ऊर्जा खात्याची बैठक अजित पवार यांनी घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपलाही मोठा झटका बसला असून, तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Political News)

Ajit Pawar, Devendra Fadnavis
INDIA Seat for Lok Sabha : 'इंडिया'तील जागा वाटपाचा तिढा सुटणार; बुधवारी फॉर्म्युला ठरण्याची शक्यता

विजेची मागणी आणि महावितरणची प्रलंबित कामे तातडीने सोडवण्यासाठी अजित पवार यांनी सोमवारी एक बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. खासकरून सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा व नगर जिल्ह्यातील अकोले, नगर, खेड, कोपरगाव, मोर्शी या भागातील आमदारांच्या समस्या होत्या. त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ऊर्जा विभागाची बैठक घेतली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अजित पवारांना (Ajit Pawar) अर्थ खाते देण्यास शिंदे गटाचा तीव्र विरोध होता. आता पवारांनी थेट फडणवीसांकडे असलेल्या ऊर्जा खात्याची बैठक घेतल्याने भाजपच्या गोटातूनही नाराजी व्यक्त होत असल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी नगरविकास विभागाची बैठक घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शिवसेनेने (शिंदे गट) राळ उठवली होती. मात्र, आता भाजपच्या ताब्यात असलेल्या ऊर्जा विभागाची बैठक घेतल्याने त्यांनी सरकारमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचे पुढे येत आहे. आता येत्या काळात याचे परिणाम सरकारच्या कामगिरीवर काय होतात? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. अर्थमंत्री या नात्याने आपण कुठल्याही विभागाच्या बैठका घेऊ शकतो. निधी उपलब्ध करून देऊ शकतो, असे म्हणत त्यांनी बैठकीचे समर्थन केले आहे. ऊर्जा विभागातील या बैठकीला संबंधित खात्याचा मंत्री उपस्थित असणे गरजेचे असताना असे न झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Political News)

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Maratha Reservation Special : लढा मराठा समाजाचा @ जालना : दिवस पंधरावा, गावात पाठिंब्यासाठी रांगा आणि... भाग-६

या बैठकीला आमदार नितीन पवार, डॉ. किरण लामहाते, देवेंद्र भुयार हे प्रत्यक्ष तर संजय शिंदे, दिलीप मोहिते पाटील, दिलीप बनकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. या वेळी महावितरणमधील लोकेश चंद्रा, मुख्य अभियंता प्रवीण परदेशी उपस्थित असल्याचे समजते.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Nana on Modi Government : `वन नेशन वन इलेक्शन’ला नानांचा विरोध नाही, पण…

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in