Ajit Pawar : गुजरातवरून अजितदादांनी शिंदे-फडणवीसांना पुन्हा घेरले...

Gujarat Election : गुजरातमध्ये निवडणुका पण महाराष्ट्रात सुट्टी?...
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Gujarat Election : सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरच शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती बांधवांना मतदान करता यावे म्हणून पगारी सुट्टी जाहीर केलीय. मात्र, निवडणुका गुजरातमध्ये आहेत मग महाराष्ट्रात सुट्टी का? असा सवाल करत राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवारांनी सरकारला घेरलं आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्यातील मतदान (voting) १ डिसेंबरला होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील गुजराती बांधवांसाठी पगारी सुट्टी शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केली आहे. त्यामध्ये १ व ५ डिसेंबर असे दोन दिवस पालघर, नाशिक (Nashik), धुळे (Dhaule) व नंदुरबार (Nandurbar) या जिल्ह्यांत ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Ajit Pawar
Aurangabad : तुपकरांसह शेतकरी मुंबईच्या दिशेने ; सिल्लोडजवळ शेतात खाल्ली दुपारची भाकर..

राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) नाराजी व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले,''शेजारच्या राज्यात निवडणुका आहेत. पण आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांना सरकारने सुट्टी जाहीर केलीय. या आधी असं कधी घडलं नाही. आम्ही देखील १५ वर्ष सत्तेत होतो. मात्र असा पायंडा पाडणं चुकीचं आहे'', असं अजित पवार म्हणाले. मुंबईत पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com