महिलांनी पुरुषांना कायद्याचा धाक दाखवलाच पाहिजे : अजित पवार

कार्यक्रमावेळी समोरच्या रांगेत बसलेल्या IAS अधिकाऱ्यांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार कानपिचक्या दिल्या.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

मुंबई : कामाच्या ठिकाणी महिला अनेक गोंष्टींवर बोलत नाहीत. घराची इज्जत जाईल, याची त्यांना भीती असते पण महिलांनी पुरुषांना कायद्याचा धाक दाखवलाच पाहिजे नाही तर जे सुरू आहे ते तसेच सुरू राहील, असे मत राष्ट्रवादीचे (NCP) नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. ते महिला दिनानिमीत्त कार्यक्रमात वाय.बी चव्हाण सभागृहात बोलत होते.

Ajit Pawar
शिवसेनेला धक्का : ज्योती पाटलांसह ५०० महिला कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

यावेळी पवारांनी आपल्या खास शैलीत भाषण केले. कार्यक्रमावेळी समोरच्या रांगेत बसलेल्या IAS अधिकाऱ्यांना पवारांनी जोरदार कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, आज तरी पहिल्या रांगा महिलांसाठी सोडायच्या, पण मी पणा सोडवत नाही, असा मिश्कील टोला त्यांनी अधिकाऱ्यांना लगावला.

Ajit Pawar
महिला अधिकाऱ्याने रात्री केली बेधडक कारवाई, मंत्री शिंगणेंनी केले कौतुक…

यावेळी पहिल्या महिला धोरणाचा किस्सा पवारांनी सांगितला. ते म्हणाले, पहाटे साडेचारला आम्ही पहिला महिला धोरणाचं बील मंजूर केलं होते. आम्ही पवार साहेबांना सांगितलं होतं की, उद्या करु पण बील पास झाल्याशिवाय जायचं नाही, असे त्यांनी आम्हाला बजावलं होते. त्यामुळे ते सकाळी साडेचारला मंजूर करण्यात आल्याचे कारण सांगितले. याबरोबरच गेल्या काही वर्षात हजारोंच्या संख्येने बाल विवाह झाल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच, आमदार आणि खासदार यांची संख्या व जागा वाढवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलेल्या मागणीबद्द्ल बोलतांना ते म्हणाले की, त्यांनी खूप अपेक्षा केली आहे. मात्र, खूप वाढ होणार नाही. मात्र, तुम्ही समाधानी व्हावं, एवढी वाढ नक्की होईल, असेही पवारांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com