विधान परिषद निवडणुकीत कोणाची विकेट पडणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितले

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

मुंबई : विधान परिषदेकडे (Legislative Council Election) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सगळे ऊमेदवार निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शिवसेनेकडे पूर्ण मते आहेत. राष्ट्रवादीकडे ५१ मते आहेत. काँग्रेसही कोटा पूर्ण करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. (Ajit Pawar Latest Marathi News)

राज्यसभेत काय घडले हे सगळ्यांनी पाहिले, आम्हालाही मतांची गरज आहे. शिवसेनेचे (Shivsena) एक मत बाद ठरले कोटा जास्त कसा देता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. शिवसेना २ ऊमेदवार निवडून येतील त्यांना मानणारे अपक्ष आहेत, बच्चू कडू, यड्रावकर याचेही मत शिवसेनेला जाणार, असल्याचे पवार यांनी सांगितले. आमदार एकत्र ठेवण्यात आले आहे, त्यांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन सुरू आहे. एक दोन आकडे आमच्याकडे घेतले तरी तीन चार आकडे कुणाला द्यायचे याचा निर्णय शेवटी घेणार आहेत. त्या संदर्भातील निर्णम महाविकास आघाडीचे मोठे नेते घेणार आहेत.

Ajit Pawar
भाजपच्या डोक्यात खडसेंचा गेम? : नाथाभाऊंना आमदार करण्याचा अजितदादांचा निर्धार

आज संध्याकाळी आमच्या आमदारांचे मार्गदर्शन केले जाईल, आमच्यावर कुणाचा दबाव नाही. अपक्ष आमदारांनी काय सुतोवाच केले हे सगळ्यांना माहीत आहे. अपक्षांचा मान सन्मान ठेवून त्यांच्याकडे मत मागितले पाहीजे, अपक्षांशी संपर्क साधून त्यांचे मत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीत एकत्र दिसत होती. मात्र, यावेळी वेगवेगळी दिसत आहे, असा प्रश्न पवार यांना विचारला असता ते म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षांकडे त्यांचा-त्यांचा कोठा आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये चौथ्या जागेसाठी तीन पक्षांकडे थोडी-थोडी मते होती. त्यामुळे एकत्रीत पणे काम सुरु होते. बहुजन विकास आघाडीला सगळे जाऊन भेटले.

Ajit Pawar
विधानपरिषद निवडणूक : खडसे-निंबाळकरांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यातच

भाजप (BJP), राष्ट्रवादी (NCP), शिवसेना, काँग्रेसचे सगळेच लोक भेटले आहेत. या निवडणुकीत काही चमत्कार होईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, काय चमत्कार होतो. कोणाच्या बाबतीत होतो, हे सोमवारी महाराष्ट्राला कळेल. जो उमेदवार २६ चा आकडा पूर्ण करणार नाही, तो उमेदवार पडेल, असे अजित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com