Anil Deshmukh News : देशमुखांची सुटका झाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Anil Deshmukh News : अनिल देशमुख यांची आज तुरुंगातून सुटका झाली
Anil Deshmukh, Ajit Pawar
Anil Deshmukh, Ajit PawarSarkarnama

Anil Deshmukh News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे तब्बल १३ महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. देशमुखांची तुरुंगातून सुटका होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Anil Deshmukh, Ajit Pawar
Anil Deshmukh News : अनिल देशमुखांची अखेर तुरुंगातून सुटका; राष्ट्रवादीचा जल्लोष

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, "आमचे सहकारी अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात होते. आज ते बाहेर आले आहेत. त्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद झाला आहे. हे प्रकरण नेमकं कसं घडलं? याचं सत्य आता लोकांसमोर येईल," अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.

पुढे ते म्हणाले, "आज आम्ही अनिल देशमुखांचं स्वागत केलं. एक बैठक घेतल्यानंतर आम्ही अधिवेशनासाठी जाणार आहोत. न्यायव्यवस्थेबाबत आम्ही जास्त काही बोलू शकत नाही. न्यायव्यवस्था जो निर्णय देते, तो सर्वांना मान्य करावा लागतो. त्याचं पालन करावं लागतं. पण आमचे एक सहकारी अनेक दिवसांपासून तुरुंगात होते. न्यायालयाने या प्रकरणात नेमका काय निर्णय दिला, हे आता सगळेजण पाहतील," असा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी दिला.

Anil Deshmukh, Ajit Pawar
Anil Deshmukh News: 'ईडी सरकारचे 'वर्ल्ड रिकॉर्ड'; देशमुखांवर तब्बल १०९ वेळा रेड'

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in