माझ्या बहिणींच्या कारखान्यांवर का छापे टाकले ?

''इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण का करायचा हे कळत नाही, उद्याच्या निवडणुकीत जनताच याचं उत्तर देतील,'' असे अजित पवारांनी (ajit pawar) सांगितले.
माझ्या बहिणींच्या कारखान्यांवर का छापे टाकले ?
ajit pawarsarkarnama

मुंबई : बारामती तालुक्यातील काटेवाडी (katewadi) येथील केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी सुरु झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान आयकर विभागाच्या अधिका-यांनी ही चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी झाल्याची माहिती आहे. याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

''आयकर विभागाने कुठे छापेमारी टाकावी हा त्यांचा अधिकार आहे. मी सर्व टॅक्स भरतो. राजकीय हेतूने ही कारवाई आहे. यात काय सापडलं हे तेच सांगतील. सत्तेचा गैरवापर कधी आम्ही केला नाही, पण माझ्या नातेवाईकांवरच का कारवाई केली, याचे वाईट वाटतं. माझ्या बहिणी ज्यांचे 35 वर्षांपूर्वी लग्न झाली आहेत. त्यातील एका बहिणीचा कोल्हापूर येथील कारखान्यावर तर पुण्याच्या बहिणीच्या दोन कारखान्यावर का धाडी टाकल्या ? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

ajit pawar
मलिकांनी NCB वर आरोप करून ड्रग्ज माफीयांची तळी उचलली आहे का ?

''त्या माझ्या बहिणी आहेत म्हणून अशा धाडी टाकल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केलं. ''इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण का करायचा हे कळत नाही, उद्याच्या निवडणुकीत जनताच याचं उत्तर देतील,'' असे अजित पवारांनी सांगितले. भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी काल महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं होते. सोमय्यांनी तक्रार केल्यानंतर राज्यातील पाच कारखान्यांची सध्या चैाकशी सुरु आहे.

Related Stories

No stories found.