Ajit Pawar's Reaction: भाजपबरोबर जाणार का? अंजली दमानियांच्या दाव्यावर अजितदादांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

Ajit Pawar's Reaction On Anjali Damania: अंजली दमानियांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar-Anjali Damania News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर जाणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानियांच्या दाव्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.

अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते. तेव्हा भाजपबरोबर (BJP) जाणार या अंजली दमानियांच्या दाव्यावर पवार म्हणाले, ''एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे'' असा टोला लगावत त्यांनी दमानियांच्या वक्तव्यावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar
Congress-Trinmool Congress: राहुल गांधींसाठी ममता बॅनर्जींची नरमाईची भूमिका; काँग्रेस-तृणमूल काँग्रेस एकत्र येणार?

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात ईडीने क्लीनचिट दिल्याच्या वृत्तावर पवार म्हणाले, ''मला आणि सुनेत्रा पवार यांना कारखाना प्रकरणात ईडीकडून क्लीनचिट मिळाल्याच्या बातमीत तथ्य नाही. ती चौकशी सध्या सुरू आहे. त्यात कुठल्याही प्रकारची क्लीनचिट मिळाली नाही. ही बातमी कशाच्या आधारे दिली हे मला समजले नाही. मात्र, मी सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो की, अशाप्रकारची क्लीनचिट अद्याप मिळालेली नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Karnataka Elections : काँग्रेसच्या व्होट बॅँकेवर JDS ची नजर ; AIMIM सोबत युती ? ; कुमारस्वामी म्हणाले..

अंजली दमानिया यांनी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत. त्यामुळे अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच... महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.'' असा दावा दमानिया यांनी केला, त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com