Girish Mahajan : अजितदादांकडून प्रश्नांचा भडिमार ; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Winter Session 2022 : आरोग्य विभागात पदे मंजुर असतात परंतु जागा भरल्या जात नाही, त्यामुळे जागा रिक्त असल्याने त्याचा परिणाम रुग्णांवर होतो
Ajit Pawar & Girish Mahajan
Ajit Pawar & Girish MahajanSarkarnama

Maharashtra Winter Session 2022 : यवतमाळ जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील वैष्णवी बागेश्वर नावाच्या 17 वर्षीय तरुणीचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळं मृत्यू झाल्याची घटना घडली होती. (Maharashtra Winter Session 2022)

या घटनेवरून आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आरोग्य व्यवस्थेवरून ताशेरे ओढत शिंदे सरकारला धारेवर धरलं. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य व्यवस्थेवरून अजित पवार यांनी अनेक प्रश्न विधीमंडळात उपस्थित केले.

अजित पवार म्हणाले, "नागपूरमधील वैष्णवी बागेश्वर मृत्यूची घटना लाजीरवाणी बाब असल्याचं म्हणत दोन वर्षे कोरोना असतानाही आरोग्य विभागाला जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्याचा निर्णय सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे आणि आम्ही घेतला होता. त्यामुळे आत्ताच्या शिंदे फडणवीस सरकारनेही शिक्षणाला प्राधान्य दिलेचं पाहिजे,"

"वैष्णवीला जेएमसी नागपूर येथे आणण्यात आलं होतं. त्यावेळी व्हेंटिलेटर तिथं उपलब्ध न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. याठिकाणी असणारे डॉक्टर यांच्यावर आरोप झाले. त्यावेळी म्हैसेकर नावाच्या डॉक्टरांची समिती नेमली. त्याठिकाणी डीन गुप्ता यांना तत्काळ कार्यमुक्त केलं आहे आणि डॉ. सपकाळ जे व्हेंटिलेटर उपलब्ध करू शकले असते त्यांनी न केल्यामुळे त्यांना पदावरून हटवलं आहे," अशी माहिती आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात दिली.

Ajit Pawar & Girish Mahajan
Maharashtra Winter Session 2022 : राहुल कुल यांनी पु्ण्याच्या 'या' महत्वाच्या प्रश्नाबाबत आवाज उठवला

"आरोग्य विभागात पदे मंजुर असतात परंतु जागा भरल्या जात नाही, त्यामुळे जागा रिक्त असल्याने त्याचा परिणाम रुग्णांवर होतो आणि बाकीच्या लोकांवर होतो. जिल्ह्यानुसार वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. नवीन महाविद्यालय सुरु झाल्यास तिथे डॉक्टर पाठवले जातात. केंद्रीय पथकाच्या तपासणीतही नवीन डॉक्टर भरती केव्हा करणार? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

नागपूर शहरापूर्ती असणारे सार्वजनिक रुग्णालये किती आहेत आणि त्यात बेड्सची उपलब्धता किती आहे? आणि त्या रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित डॉक्टरांची किती पदं मंजुर आहेत? आणि किती पदं रिक्त आहे? असे सवाल अजित पवारांनी आरोग्य मंत्र्यांना विचारले आहेत.

"एमपीएसच्या माध्यमातून 300 डॉक्टरांची पदे भरली आहेत. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. या संदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करुन त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. एमपीएससी (MPSC) मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो. आत्तापर्यंत 10 टक्के हॉस्पिटल आणि 90 टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता 30 टक्के हॉस्पिटल आणि 70 टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल. राज्यात डॉक्टर, विविध तंत्रज्ञ यांच्या चार हजार जागांची भरती करणारआहोत," अशी घोषणा महाजन यांनी यावेळी केली.

अजित पवार संतापले..

"नवीन महाविद्यालयात जुन्या महाविद्यालयातील डॉक्टर पाठवण्याचा प्रकार केव्हा थांबणार? कारण एक मुलगी तिथे मृत्यूमुखी पडली आणि सातत्याने अशाप्रकारे घडत हे सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे, त्याबाबत सरकारची काय भूमिका आहे," असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com