Ajit Pawar News : "कसब्याची निवडणूक 'त्यांना' अशी झोंबली की.. " ; अजित पवारांनी दिलं भाजपला आव्हान!

Ajit Pawar On Kasba Win: काटे-कलाटे दोघे उभे म्हणून.. सत्तेचा ताम्रपट कोणी घेऊन आला नाही.
Ajit Pawar News :
Ajit Pawar News :Sarkarnama

Kasba By-Election : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभापोटनिवडणुकीवरून अजित पवारांनी भाजपला लक्ष्य केले. तसेच, महाविकास आघाडी म्हणून एकसंधपणे आपण येणाऱ्या निवडणुकींना सामोरे गेलो तर आगामी काळात आपला विजय निश्चित आहे,असेही पवार म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एका सभेतून अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, "शिंदे-फडणवीस सरकार आलं आणि आमच्या काळात घेतलेल्या विकास कामांच्या निर्णयांना स्थगिती देवून टाकली. का बरं? तिथे माणसं राहत नाही का? ती कामे करा. तुम्हीही नवीन कामे करा. काय होतंय जास्त कामं झाली म्हणून, हा कशाला रडीचा डाव. ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलं नाही. जनतेच्या मनाते येईल तेव्हा जनता बदल करते," असा इशारा त्यांनी दिला.

Ajit Pawar News :
Pradnya Satav Attack Update: प्रज्ञा सातव हल्ला प्रकरणी नवी अपडेट; पोलीस अधीक्षकांनी सांगितलं हल्लेखोराचं सत्य...

"आताच्या काळात शिक्षकांना आणि पदवीधरांनी बदल कलेला महाराष्ट्राने पाहिला. कसब्याची निवडणूक तर त्यांना अशी झोंबली. ते म्हणतात, ती निवडणूक हरली तरी आम्ही जोमाने जावू. तुम्ही जोमाने जाणार मग आम्ही बिन-जोमाने जाणार आहोत का? यांच्यातच जोम आहे का? आमच्यात जोम नाही? आम्ही तर आणखी डबल जोमाने जावू. कसब्यात २८ वर्षे भाजपचा आमदार निवडून येत होता. तिथे भाजपचा पराभव झाला," असेही अजित पवारांनी सुनावले.

Ajit Pawar News :
Dhangekar Vs Rasane : रवींद्र धंगेकरांचा रासनेंवर कडक पलटवार; म्हणाले,'' तो मोठा माणूस,पण...''

"महाविकास आघाडी एकसंध ठेवून आपण गेलो तर, निश्चितच आपल्याला यश मिळेल. गावपातळीवरही कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीत एकोपा ठेवला पाहिजे. कसबा आणि चिंचवडला पण टफ फाईट झाली. चिंचवडला आपले दोघे उभे राहिले. काटे आणि कलाटे दोघे उभे राहिले. दोघांनीही उमेदवारी मागितली होती. दोघांनी घेतलेली मते विचारात घेतली तर भाजपपेक्षा जास्त आहेत. पण, तिथे सगळ्यांची सांगड घालायला कमी पडलो. पण इथून पुढे आपण एकत्र लढले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com