Ajit Pawar on Controversy : 'मी इतिहासाचा अभ्यासक नाही, पण विधानसभेतल्या विधानावर ठाम'

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात त्यांच्याकडे का राजीनामा मागितला नाही, असाही सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

Ajit Pawar on controversy : 'आजपर्यंत मी माझ्या भाषणात कधीही महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये केली नाहीत. मी कोणतही वादग्रस्त विधान केलेलं नाही. मी आजही माझ्या मतावर ठाम आहे. मला महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेते पद दिले आहे. त्यामुळे माझ्याकडे राजीनामा मागण्याचा अधिकार भाजप नेत्यांना नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट आहे.

हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर गदारोळ झाला. भाजपकडून (BJP) अजित पवार यांच्या राजीमान्याची मागणी करत मोठी आंदोलने करण्यात आली. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Ajit Pawar
BJP : भाजपच्या माजी नगरसेवकांना लागले निवडणुकीचे वेध, म्हणतात हीच ती वेळ !

काय म्हणाले अजित पवार?

मी असा कोणता गुन्हा केला, काही चुकीचं बोललोय, असंही काही नाही. मला राजीनामा मागण्याआधी ज्यांनी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये केली त्यांच्याकडे का राजीनामा मागितला नाही. असाही सवाल करत अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांवरही निशाणा साधला.

भाजप नेत्यांनी कायम महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली. पण त्यांच्यावर कारवाई का केली नाही. त्यांच्याकडे कोणी राजीनामा मागितला नाही, त्यांच्याबाबत गप्प राहून माझ्याविरोधात लोकांच्या भावना भडकवून, त्यांना आंदोलने करायला सांगितली, माझ्या राजीनाम्याची मागणी करायला लावली, असाही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

राज्यपालांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त केलं, सत्तारुढ पक्षांच्या आमदारांनी महाराजांची उपमा थेट त्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. भाजप नेते सातत्याने महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये करत आहेत. पण त्यांना कोणी राजीनामा द्यायला का लावत नाही, त्यांना कोणी माफी मागायला का सांगत नाही, असही अजित पवार यांनी विचारलं आहे. माझ्याविरोधात आंदोलने करणाऱ्यांनी एकदा स्वत:च्या अंतर्मनाला विचारावं, आपल्या पक्षातील नेत्यांनी जी वादग्रस्त वक्तव्ये केलीl, त्यांच्याबद्दल त्यांनी राजीनामा द्यायला सांगावा, माफी मागायला सांगावी, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com