Ajit Pawar News : 'अजितदादांवर सत्ताधाऱ्यांकडून हक्कभंग आणला जाणार? प्रश्न विचारताच दादा म्हणाले...

Maharashtra Assembly : आयुधांचा वापर करून काही गोष्टी करता येतात...
Ajit Pawar News :
Ajit Pawar News :Sarkarnama

Budget Session : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ९ मार्च रोजी राज्याचं अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. दरम्यान हक्कभंग हा विषय चर्चेला आला होता. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हंटल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंग आणला जावा, अशी सत्ताधारी गटाची तयारी होती, यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही संबोधले, असा आरोप करून, विरोधकांनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली होती. आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हक्कभंग आणण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar News :
Chinchwad : अजित पवार - राहुल कलाटे - नाना काटे रात्री दोन वाजेपर्यंत एकत्र बसले : मार्ग का निघाला नाही?

यावर आता स्वत: अजित पवार यांनी भाष्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी आपल्यावर आणण्यात येणाऱ्या हक्कभंगाविषयी वाच्यता केली आहे. "अधिवेशन सुरू आहे, कुठेतरी तुमच्याविरूद्ध हक्कभंग आणला जातोय. विधान परिषेदेमध्ये तुमच्याविरूद्ध हक्कभंग आणण्याची तयारी विरोधक करत आहेत ? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले,"तो त्यांचा अधिकार आहे. वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून, ज्या काही गोष्टी करता येऊ शकतात, त्या तिथे होणार. हक्कभंग आणला म्हणजे, लगेच काही घडलं, असं नाही. विशेष हक्क समितीकडे ते जाईल. त्याची शहानिशा होईल. त्याच्याबद्दल साधक-बाधक चर्चा होईल. वेळ आली तर आम्हाला काही विचारणा येईल. मग पुढचा निर्णय होईल."

Ajit Pawar News :
Ajit Pawar News : "कसब्याची निवडणूक 'त्यांना' अशी झोंबली की.. " ; अजित पवारांनी दिलं भाजपला आव्हान!

अजित पवार पुढे म्हणाले, "मी ३२ - ३३ वर्षे विधिमंडळात आहे, अशा गोष्टी घडत असतात. आपण आपल्या सदसदविवेकबुद्धीला स्मरूण, चांगलं काम करत राहायचं,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com