बोलघेवड्या नेत्यांना अजितदादांनी सुनावलं; आधी आपल्या भागात विजय मिळवा...

Ajit Pawar | NCP | Sharad Pawar | Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत नेते पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषण केली...
Ajit pawar Latest Marathi News, NCP News, Political News
Ajit pawar Latest Marathi News, NCP News, Political NewsSarkarnama

मुंबई : येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आढावा बैठकीत नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोलघेवड्या पक्ष पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. आजच्या या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि इतर अनेक बडे नेते उपस्थित होते. हे पाहून अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणं केली. ही भाषण ऐकून अजित पवार यांनी आधी आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे सांगत पदाधिकाऱ्यांना आपल्या भागावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले.

बैठकीत मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले, राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तरी त्या लढविण्यासाठी आपण तयार हवं. आवश्यक असेल तिथे आघाडीच्या माध्यमातून अन् आपली ताकद जास्त असेल तिथे कोणाचीही मदत न घेता निवडणुका लढाव्यात. राष्ट्रवादीने १५ वर्षे काँग्रेससोबत संसार केला. मात्र त्यातही काही ठिकाणी वेगळ्या निवडणुका लढवल्या. यातून केवळ समोरील विरोधकांचा पराभव झाला पाहिजे ही भूमिका होती. आता येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि काँग्रेस त्यांची भूमिका लवकरच मांडतील. पण भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येऊन किंवा स्वतंत्र लढण्याची, जिथे गरज असेल तिथे तशी भूमिका घ्यायची, असेही पवार म्हणाले.

याशिवाय अधिवेशन काळात सभागृहात आक्रमक भूमिका मांडण्याचे काम निश्चितपणे होईल. जिथे सत्ताधारी चुकीचे असतील तिथे आवाज नक्कीच उठवू. पण योग्य असेल तिथे राजकारण करण्याची भूमिका घेणार नाही, अशी ग्वाही देखील अजितदादांनी दिली.

लोकांच्या प्रश्नांसाठी धावून जा.. :

आज पावसामुळे गडचिरोली येथे उद्भवलेली परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे राज्यात पावसाची परिस्थिती काय आहे यावर लक्ष ठेवून कुठे कुठे लोकांना मदतीची गरज आहे याकडे लक्ष ठेवावे. कुठे अडचण आली तर त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सदैव धावून जाते हे कृतीतून आपण सर्वांनी दाखवायचे आहे, असेही अजितदादा म्हणाले.

देशात बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे. याविरोधात पक्षाच्या वतीने आंदोलनाची भूमिका आपण घ्यायला हवी. केंद्राकडून अन्नधान्य, डाळी, पीठ, दूग्धजन्य पदार्थ अशा जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी आकारण्यात येणार आहे. याचा फटका गरीब आणि मध्यमवर्गाला बसणार आहे. याविरोधात देखील आपल्याला आंदोलन करावे लागेल, अशी सूचना अजितदादांनी केली. तसेच विधिमंडळातील कार्यालयात सोमवार ते बुधवार आपण उपस्थित असणार असून इतर वेळी दौऱ्यानिमित्त बाहेर पडू, अशी माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in