Ajit Pawar On Bawankule: "करेक्ट कार्यक्रम करू," असं बावनकुळे म्हटल्यापासून मला झोप येत नाही ; अजित पवारांचा टोमणा

Maharashtra Assembly Winter Session 2022 : बावनकुळे यांनी अजित पवारांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता.
Maharashtra Assembly Winter Session 2022  news update
Maharashtra Assembly Winter Session 2022 news updatesarkarnama

Maharashtra Assembly Winter Session 2022 : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे.आज (गुरुवारी) विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. गुवाहाटीला चला तुम्ही, सुरतेला चला.. खोक्यांनी लुटा, कधी खोऱ्याने लुटा..., अशा घोषणा देत विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावू धरली. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार (ajit pawar)यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.

बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अजित पवारांनी बावनकुळेंनी अधिवेशनात हल्ला परतवून लावला होता. आजही पवारांनी बावनकुळेंना टोला लगावला.

"अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे ठेवलं. ते जयंत पाटील (Jayant Patil) यांना द्यायला हवं होतं. येत्या 2024 निवडणुकीत (Assembly Elections 2024) अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल," असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजितदादांना चिमटे काढले होते. त्यानंतर अजित पवारांनी गुरुवारी विधानभवन परिसरात त्यांना प्रत्युत्तर दिले.

अजित पवार म्हणाले, "बावनकुळे यांनी आमचा करेक्ट कार्यक्रम करू असं सांगितलं तेव्हापासून मला झोप येत नाही," "आम्ही राजकारणातून संन्यास घेतलेला बरा," असा खोचक टोला अजित पवारांनी बावनकुळे यांना लगावला.

Maharashtra Assembly Winter Session 2022  news update
BMC NEWS : कार्यकर्त्यांचा राडा टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं उचलले 'हे' मोठे पाऊल

उद्या (शुक्रवारी) अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावर अजित पवार म्हणाले, "आम्ही तीन आठवडे अधिवेशन घ्या, अशी मागणी केली होती.अधिवेशन तीन आठवडे घेऊ असे सांगण्यात आले होते. परंतु आज अंतिम आठवडा बाबत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. "विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी आणखी एक आठवडा पाहिजे होता," असे अजितदादा म्हणाले.

Maharashtra Assembly Winter Session 2022  news update
Lok Sabha elections : शिवसेनेच्या 'या' जागांवर भाजपचा डोळा

‘इंचभरही जमीन देणार नाही’ या कर्नाटकच्या ठरावाला महाराष्ट्र विधिमंडळाने प्रत्युत्तर दिल्यामुळे खवळलेल्या बोम्मई सरकारचे उच्च शिक्षणमंत्री अश्वत्थ नारायण व कर्नाटकचे कायदामंत्री माधुस्वामी यांनी महाराष्ट्रद्वेषाची गरळ ओकली. ‘बेळगाव केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा असे उद्धव ठाकरे म्हणत असतील तर २० टक्के कानडी लोकसंख्या असलेल्या मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा,’ असे प्रतिआव्हान त्यांनी दिले. कर्नाटकातील दुसरे आमदार लक्ष्मण सौदी यांनी तर मुंबई कर्नाटकचीच असल्याचा दावा केला आहे. याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, "कर्नाटकच्या मंत्र्यांनी मुंबई बद्दल जे वक्तव्य केलं त्याबाबत आज अधिवेशात प्रश्न विचारणार आहोत," "सत्ताधारी आमच्या आड लपण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या हिम्मत असेल तर त्यांनी तीन आठवड्याचं अधिवेशन घ्यावे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com