NCP Janata Durbar: सकाळी मुश्रीफ, दुपारी धनूभाऊ, तर संध्याकाळी तटकरे, भुजबळ, वळसे लोकांची गाऱ्हाणे ऐकणार

Dhananjay Munde & Hasan Mushrif News: पक्षातील कथित फुटीनंतर हा दरबार आता अजित पवार आणि त्यांच्या गटाने पुढे सुरू ठेवला आहे.
Dhananjay Munde & hasan mushrif News
Dhananjay Munde & hasan mushrif NewsSarkarnama

Ajit Pawar News : जनता, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणारा जनता दरबार हा राष्ट्रवादी एकसंध असल्यापासून मुंबईतील प्रदेश कार्यालयात भरवला जात होता. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: त्यात सहभागी होत होते. पक्षातील कथित फुटीनंतर हा दरबार आता अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या गटाने पुढे सुरू ठेवला आहे.

आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरुवार असा तीन दिवस नव्या राष्ट्रवादीचा (NCP) हा दरबार त्यांच्या मुंबईतील नव्या कार्यालयात (राष्ट्रवादी भवन, ए-४, राजगड, मंत्रालयासमोर) भरणार आहे. त्याचे पुढील आठवड्याचे (ता.२९ ते ३१) वेळापत्रक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी जाहीर केले आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन सत्रात तो होणार आहे.

Dhananjay Munde & hasan mushrif News
PCMC News : पालकमंत्री पाटलांच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस अॅक्शन मोडवर

त्याची जबाबदारी पक्षाच्या नव्या नऊ मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहे. तूर्तास अजित पवार हे त्यात सहभागी नाहीत. मात्र, त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न ते सोडवणार आहेत. सकाळी नऊ ते ११ या पहिल्या सत्रातील सकाळची तिन्ही दिवसांची जनता दरबाराची जबाबदारी हसन मुश्रीफ आणि दुपारी दोन ते चार हे धनजंय मुंडे (Dhananjay Munde) पाहणार आहेत.

Dhananjay Munde & hasan mushrif News
PCMC News : थकबाकीदारांवर जप्ती, तर प्रामाणिक करदात्यांचे गुणगान : पिंपरी पालिकचे कृतज्ञता अभियान

सकाळी ११ ते दुपारी एक या दरम्यान संजय बनसोडे आणि अनिल पाटील, तर सायंकाळी चार ते सहा या वेळेत छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि अदिती तटकरे हे गाऱ्हाणी ऐकणार आहेत. या माध्यमातून अजित पवार गट आता अॅक्शन मोडवर आला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in