जितेंद्र आव्हाडांसाठी अजितदादा मैदानात; ट्वीट मागे घेणार...

Ajit Pawar News : जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
Jitendra Awhad, Ajit Pawar
Jitendra Awhad, Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar News : विनयभंगाचा प्रकार कुठे दिसत नसताना, गुन्हा दाखल केला. महाराष्ट्राच्या परंपरेला तिलांजली देण्याचे काम सुरु आहे. आम्ही सर्वजन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिशी आहोत. नागरिकांच्या विश्वासाला तडा जाण्याचे काम करायला नको. लोकशाही टिकली पाहिजे, नियमाचा अधार घेऊन काम करावे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

चुकलेले असेल तर तुम्ही अॅक्शन घ्या पण चुकलेले नसताना गुन्हा दाखल करणे योग्य नाही. पोलिसांनी दबावाला घाबरु नका, काय नियम काय सांगतो, ते पहा. बदल होत असतात, अशा इशारा पवार यांनी दिला. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेले ट्वीट मागे घ्यावे, पवार साहेब, जयंत पाटील यांची ती भूमिका आहे. अधिवेशनामध्ये या प्रश्नांना वाचा फोडू, असेही पवार यांनी सांगितले.

Jitendra Awhad, Ajit Pawar
राऊत-आव्हाडांवरील गुन्हे मागे घ्या; आम्ही शिंदे गटात प्रवेश करतो : शिवसेना नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांना ऑफर!

शरद पवार (Shadar Pawar) साहेब अंतिम आदेश देतील तो आव्हाड यांना मान्य असेल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. गृहखाते साडे सतरा वर्ष राष्ट्रवादीकडे होते. कधी कोणी असे वागले नाही. अन्याय केला नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जावे लागते ही महाराष्ट्राची परंपरा आहे, आम्ही सगळे जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी आहोत...लोकशाही टिकली पाहिजे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

चित्रपट प्रकरणात ती व्यक्ती म्हणते जितेंद्र आव्हाड यांनी वाचवले तरी गुन्हा नोंदवला. ह्या मागे सूत्रधार कोण? हे षडयंत्र आहे, असा आरोप पवार यांनी केला. गाडीत मुख्यमंत्री बसले होते. सरकार बदलले म्हणून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार येते जाते कोणी कायम सत्तेत नसतो. मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे ही घटना माझ्यासमोर झाली, हा विनयभंग नाही, असेही पवार म्हणाले.

Jitendra Awhad, Ajit Pawar
अलीकडच्या काळात काही जणांकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू

७२ तासात राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्र्यांवर दोन गुन्हे दाखल होतात. आव्हाड आक्रमक नेते आहेत. ज्या कारणा करीता विनयभंग गुन्हा दाखल केला, त्यात कुठेही विनयभंग झालेला दिसत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आव्हाड यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com