कौशल्य कोणाकडे आहे ते विधान परिषद निवडणुकीत कळेल : अजित पवारांचे भाजपला आव्हान

Ajit Pawar | Devendra Fadnavis | : निवडणुकीत जो जिंकतो त्याच्याकडे कौशल्य असते
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama

माळेगाव : आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे. या आगोदरही तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र आले होते. प्रत्येक पक्षाचा उमेदवार निवडून आणणे ही त्या-त्या पक्षाची जबाबदारी आहे. निवडणुकीत जो जिंकतो त्याच्याकडे कौशल्य असते असे म्हटले जाते. महाराष्ट्रात कोणाकडे कौशल्य आहे हे विधान परिषद निवडणुकीनंतर कळेल, असे म्हणतं अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला आव्हान दिले.

बारामती येथे सायन्स अॅंड इनोव्हेशन अॅक्टीव्हिटी सेंटरच्या उद्धाटन कार्य़क्रमाच्या निमित्ताने आले असता पवार पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या आमदारांना एकत्र केले जात असून अपक्ष आमदारांशीही संपर्क साधण्यात येत आहे. या निवडणुकीत आमचे कौशल्य दिसून येईल, असेही अजित पवार पुढे म्हणाले.

मला 'त्यावर' काहीही बोलायचे नाही :

देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमातील प्रसंगाविषयी विचारले असता पवार म्हणाले, देहु मधील कार्यक्रमाबाबत मला काहीही बोलायचे नाही. हा कार्यक्रम होऊन बरेच दिवस झाले. पंतप्रधान दिल्लीतही पोहचले. देहूत अतिशय चांगला कार्यक्रम झाला. देहू वारकरी संप्रदायातील अतिशय महत्वाचे ठिकाण आहे आणि पंतप्रधान या कार्यक्रमाला आले होते, याचे सर्वांना समाधान आहे.

'त्या' वक्तव्याला फारसे महत्व नाही :

राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार यांना भाजपसोबत येण्याचे आमंत्रण दिले, याबाबत बोलताना पवार म्हणाले, की आमचे इथे बरे चाललयं. कोणी काय वक्तव्य करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे म्हणतं त्यांनी विखे पाटील यांच्या वक्तव्याला फारसे महत्व देण्याचे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com