CM शिंदेंनी कार्यकर्त्यांना आवरावं; फडणवीसांना असं वागतांना कधी बघितले नाही : अजित पवार

CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Ajit Pawar : काहीही पाळलं जात नाही. राज्याचे प्रमुखच नियम मोडतात.
Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar
Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या उत्साही कार्यकर्त्यांना आळा घालायला हवा. रात्री दहानंतरचे कार्यक्रम टाळायला हवेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे रात्री दहानंतरचे कार्यक्रम बघितले नाहीत, असा सल्ला आणि टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नांवरुनही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. (NCP | Ajit Pawar Latest News)

अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना, पुरग्रस्तांना मदत करायची सोडून मुख्यमंत्री गाठीभेटी घेतात. रात्री दहानंतरही मुख्यमंत्र्यांचं भाषण होते. वास्तविक रात्री दहानंतर सर्वोच्च न्यायालयाने माईक बंद केलेला आहे. गणेशोत्सव, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अशा काही अपवादात्मक दिवसांसाठी मुभा दिली आहे.

पण यातलं काहीही पाळलं जात नाही. राज्याचे प्रमुखच नियम मोडतात. मग अशावेळी तिथला पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त काय करणार? मुख्यमंत्री घटना पायदळी तुडवायला लागले तर बरोबर नाही. उपमुख्यमंत्र्यांचं दहा नंतरचे कार्यक्रम काही पाहिले नाही, त्यामुळे त्यावर काही जास्त बोलू शकत नाही." असेही अजित पवार यांनी म्हटले. (NCP | Ajit Pawar Latest News)

यावेळी बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय दौऱ्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांना, पूरग्रस्तांना मदती मिळवून देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय दौरे सुरु आहेत. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी कोणते कार्यक्रम घ्यावेत हा त्यांचा अधिकार आहे. पण नाशिक, औरंगाबाद किंवा इतर भागात ते गेले तिथे मिरवणुका सत्कार सुरु आहेत. आम्ही पण कधी काळी उपमुख्यमंत्री होतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्याच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना अजित पवार म्हणाले, एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असतानाही विलंब का होत आहे? मंत्रिमंडळ विस्तारासाठी कुणाची वाट पाहताय? मी अनेक वर्ष प्रशासनामध्ये होतो, त्यामुळे मी काही अधिकाऱ्यांना विचारले, तर सांगितले उपमुख्यमंत्र्यांवर कसलीही जबाबदारी नाही. सगळ्या कामांची जबाबदारी केवळ मुख्यमंत्र्यांवर आहे. काहीही झालं की प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाते, असेही अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in