Raj Thackeray On Ajit Pawar: '' अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत, पण मी...''; राज ठाकरेंचा खोचक टोला

Maharashtra Politics : '' उध्दव आणि माझ्यात कुणी विष कालवलं...''
Raj Thackeray On Ajit Pawar
Raj Thackeray On Ajit PawarSarkarnama

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे अनेकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निशाण्यावर असतात. काही दिवसांपूर्वीच ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत अजित पवार यांची मिमिक्री करत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. या मिमिक्रीची चर्चा होत असतानाच अजित पवार यांनी राज ठाकरे यांना मिमिक्रीशिवाय दुसरं येतंच काय अशा शब्दांत निशाणा साधला होता. लगावला होता. यावर आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सध्याचं राजकारण, शिवसेनेतील बंडखोरी, उध्दव ठाकरेंसोबतचं नातं, कोकणातील बारसू प्रकल्प, मनसेची वाटचाल अशा विविध मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवरही निशाणा साधला.

Raj Thackeray On Ajit Pawar
Sandiapan Bhumare News : "भुमरेंनी केला 'टॅब घोटाळा.." ; विरोधी पक्षनेते दानवेंचा आरोप !

ठाकरे म्हणाले, अजित पवार(Ajit Pawar) हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे ते काही इतर आमदार निवडून आणू शकत नाहीत हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. पण मी माझा स्वतःचा पक्ष काढला होता, त्यामधून 13 आमदार निवडून आणले होते.पक्ष म्हटला की, चढ-उतार हे येतातच. पण अजित पवार म्हणतात, आता माझ्याकडे एकच आमदार आहे. त्यांना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नव्हते असा खोचक टोलाही ठाकरेंनी अजित पवारांना लगावला.

हे काही बाळासाहेबांचं स्वप्न नव्हतं...

राज्यात २०१९ पासून मागील चार वर्षात शिवसेनेच्या दोन नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यात महाविकास आघाडी सरकारमध्ये उध्दव ठाकरे तर भाजप शिवसेना(शिंदे गट) युतीत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर देखील राज ठाकरे यांनी सडेतोड भाष्य केलं. ते म्हणाले, या दोघांपैकी कुणीही शपथ घेताना बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्याचं वाटलं नाही. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं हे काही बाळासाहेबांचं स्वप्न नव्हतं. महाराष्ट्र बलशाली व्हावा हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं असं ठाकरे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray On Ajit Pawar
Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाला मोठा झटका; घाटकोपरमधील 'या' नेत्याचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश

मुख्यमंत्री असताना ठाकरेंना ही गोष्ट का लक्षात आली नाही?

रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. यावरही त्यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री असताना बारसूचे पत्र हे उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं, ते खालच्या माणसांवर ढकलून कसं चालेल? त्यावेळी त्यांना माहिती नव्हतं का त्या ठिकाणी कातळ शिल्प सापडली? इतकी हजारो एकर जमीन एका दिवसात खरेदी केली नसणार आहे. कोकणातील माणसाकडून कवडीमोल किमतीत जमीन घ्यायची आणि ती हजारोपटींनी सरकारला विकायची हा धंदा काहीजणांनी सुरू केला आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कशी काय लक्षात आली नाही? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.

उध्दव आणि माझ्यात कुणी विष कालवलं...

राज ठाकरेंनी शिवसेने(Shivsena)तून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे) हा पक्ष काढला होता. मात्र, यानंतर उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्यात आलेली कटुता अद्यापही कायम आहे. तसेच दोन्ही बंधूंकूडन एकमेकांवर टीकाही केली जाते.यावर राज ठाकरेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, ते खूप छान दिवस होते. पण आमच्यात कुणी विष कालवलं किंवा आमच्या नात्याला कुणी नजर लावली हे मला माहित नाही.

Raj Thackeray On Ajit Pawar
Lok Sabha elections : लोकसभा जागांबाबत पवारांची भूमिका स्पष्ट ; म्हणाले, "ज्या ठिकाणी ठाकरे गटातील खासदार आहेत, त्या जागा.."

सध्या ' द केरला स्टोरी' या चित्रपटावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. काही राज्यात हा चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात शो आयोजित केले जात आहेत. तर काही काही राज्यांनी या चित्रपटावर बंदी आणली आहे. यावर ठाकरे म्हणाले,आपल्याला वाटतं की, आपण लोकशाहीमध्ये राहतोय, पण ही वस्तुस्थिती नाही. झेंडा या चित्रपटामध्ये माझे कॅरेक्टर काहीसं निगेटिव्ह दाखवण्यात आलं होतं. पण मी त्याला विरोध केला नाही. पण आता चित्रपटांना विरोध केला जात आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते..?

राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे. राज ठाकरे यांना जनतेने कधीच नाकारलं आहे. मागे त्यांनी 14 आमदार निवडून आणले होते. दुसऱ्या टर्मला एक आमदार आला. आमचे जुन्नरचे सहकारी शरद सोनावणेंनी तिकीट घेतलं म्हणून तेवढी पाटी लागली.

आता कल्याणचे आमचे सहकारी निवडून आले. त्यांच्याबरोबर जे होते. काही लोकं सोडली तर सर्व लोकं दूर गेली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याऐवजी, त्यांना अजित पवारांवर मिमिक्री करणं आणि व्यंगचित्र काढणं यात समाधान वाटतं. यातून ते समाधानी होत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत अशी टीका पवारांनी केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com