राष्ट्रपती, मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच निवडा ; अजितदादांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

ज्यांच्याकडे मसल व मनी पॉवर आहे असेच लोक निवडणूक जिंकू शकतात.
Ajit Pawar, eknath shinde
Ajit Pawar, eknath shindesarkarnama

बारामती : नगरपरिषद अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी हल्लाबोल केला आहे. (Ajit Pawar latest news)

"जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला तुम्ही राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करा," असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज शिंदे सरकारवर केला. बारामतीत ते माध्यमांशी बोलत होते.

नगराध्यक्ष व सरपंचपद जनतेतून निवडण्याच्या भूमिकेवर ते म्हणाले, "या प्रश्नाबाबत दोघांच्या मंत्रीमंडळाला खूप घाई झालेली दिसते.सरपंच व नगराध्यक्ष इतर विचारांचे असतील तर काय होते याचा अनुभव या पूर्वी घेतला आहे. अधिकाराचे केंद्रीकरण ही बाब लोकशाही घातक आहे. ज्यांच्याकडे मसल व मनी पॉवर आहे असेच लोक निवडणूक जिंकू शकतात,"

पवार म्हणाले, "लोकशाहीमध्ये काही परंपरा असतात, 1967 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली, त्यांनी ही धोरणे ठरवली, तेही दूरदृष्टीचेच नेते होते, बहुमत ज्या पक्षाला असते त्यांचे खासदार पंतप्रधान ठरवतात, राज्यातही 145 आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री होतात त्याच पध्दतीने याही निवडी होत होत्या, तशाच पध्दतीने नगराध्यक्ष व सरपंचपद निवडले गेले असते तर बरे झाले असते,"

Ajit Pawar, eknath shinde
डिसले गुरुजींना दिलासा ; ग्लोबल टिचरबाबत चुकीचं काम होऊ नये.., मुख्यमंत्र्यांकडून आदेश

"विधीमंडळात हा मुद्दा मांडून चर्चा करुन ज्या सूचना येतील त्यांचा विचार करुन मगच हा निर्णय घ्यायला हवा होता. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. आमदारांचे मत यात विचारातच घेतले गेले नाही," असे पवार म्हणाले.

"कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतक-यांना मतदानाचा अधिकार दिला या बाबत आपले दुमत नाही, पण निवडणूकीचा मोठा खर्च बाजार समितीला करावा लागणार आहे. राज्यातील अनेक बाजार समित्या एवढा खर्च पेलू शकणार नाहीत, त्यांना खर्चच झेपणार नसेल तर मग शासन निवडणूका थांबवणार का," असा सवाल अजित पवार यांनी केला.

"शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र लढणार का, यावर अजित पवार म्हणाले, "अंतिम निर्णय शरद पवार व उध्दव ठाकरे हे घेतील, ते दोघे जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही करु,"

पूरग्रस्तांना मदत करा

"नवीन सरकारने बहुमतावर सर्व गोष्टी केल्या मग मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही, पूरपरिस्थिती असताना तातडीने पालकमंत्री नेमून त्यांच्यावर तेथील जबाबदारी द्यायला हवी, पालकमंत्र्यांनीही सरकारी यंत्रणेला विश्वासात घेत उपाययोजना करणे गरजेचे आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार करावा. महापूराचा त्रास होत आहे, दुबार पेरणी करावी लागणार आहे, भातशेतीचे नुकसान झाले आहे, बियाणे नव्याने द्यावे लागेल, जमिनीचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करावे लागणार आहे, घरांच्या नुकसानीचा अंदाज घ्यावा लागणार आहे, पूरग्रस्तांना एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात द्यायला हवा," असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in