अजितदादांचं जनतेला गिफ्ट; सीएनजीसह स्वयंपाकाचा गॅस होणार स्वस्त

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे.
Piped Natural Gas
Piped Natural Gas Sarkarnama

मुंबई : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे स्वस्त इंधन पर्याय म्हणून वाहनचालकांकडून सीएनजीला (CNG) पसंती दिली जात होती. मात्र, आता सीएनजीवर गाडी चालवणेही महाग झाले आहे. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सीएनजी आणि स्वयंपाकाच्या गॅसवरील करात कपात करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यामुळे सीएनजी आणि स्वयंपाकाचा गॅस स्वस्त होणार आहे.

रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 130 डॉलरवर पोचला आहे. खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाल्याने सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी सीएनजी आणि स्वयंपाकाचा पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) यावरील मूल्यवर्धित कर (VAT) 13.5 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर आणला आहे. यामुळे सीएनजीसह पीएनजी स्वस्त होणार आहे. मागील वर्षभरात सीएनजी तब्बल 18 रुपयांनी महागला आहे. तो सध्या प्रतिकिलो 66 रुपयांवर पोचला आहे. याचवेळी पीएनजीही प्रतियुनिट 39.50 रुपयांवर पोचला आहे.

Piped Natural Gas
निवडणुका संपल्या; सीएनजीनंतर आता पेट्रोल, डिझेलसोबत एलपीजी सिलिंडरचा नंबर?

मुंबईसह अन्य प्रमुख शहरांतील महापालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. आगामी काळात रशिया-युक्रेन युद्धामुळे सीएनजीसह पीएनजी मोठ्या प्रमाणात महागण्याची चिन्हे आहेत. सरकारने आधीच यावरील कर कमी केल्याने जनतेला सीएनजी आणि पीएनजीच्या दरवाढीची फारशी झळ आगामी काळात बसणार नाही. मुंबई महानगरात याचा तब्बल 8 लाख सीएनजी ग्राहकांना याचा थेट फायदा होईल. तसेच, मुंबई महानगरातील तब्बल 18 लाख पीएनजी ग्राहकांनाही याचा फायदा होईल.

Piped Natural Gas
रशियाचं असंही क्रौर्य! उपासमारीनं मरू लागले नागरिक; 11 दिवसांपासून वीज-पाणी तोडलं

केंद्र सरकारने मागील वर्षी नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केली. यामुळे सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका टॅक्सी, बस आणि रिक्षांसोबत खासगी कारचालकांना होत आहे. स्वस्त इंधनाचा पर्याय म्हणून सीएनजीकडे वळणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा भुर्दंड यामुळे बसू लागला आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षा संघटना आता भाडेवाढ करण्याची मागणी करू लागल्या आहेत. राज्य सरकारने करात कपात केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com