Ajit Pawar : शिंदे अन् फडणवीसांना भेटून दिलेला सल्ला अजितदादांनी पत्रकार परिषेदेत सांगितला!

Ajit Pawar : मंत्रीपदावर असूनही काहीही बोलत सुटत आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

मुंबई: दिवाळीपूर्वी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही वेळ घेऊन, त्यांना भेटलो होतो. या भेटीत मी त्यांना सांगितलं की, तुमच्या शिंदे आणि भाजपात वाचाळवीरांचा प्रस्थ वाढत आहे. मंत्रीपदावर असूनही काहीही बोलत सुटत आहेत, असं विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी म्हंटले आहे. आज पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी बोलताना पवार यांनी हा खुलासा केला.

सद्याचं महाराष्ट्रातलं सरकार कशा रितीने स्थापन झाले आहे. याच्या खोलात मला जायचे नाही. मात्र सरकारच्या दबावाखाली पोलिस आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. पोलीसच दबावाखाली काम करत असतील अनेक बाबी अवघड होत जातील. अधिकारी काम करत असताना थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आदेश येतात. इतक्या जास्त प्रमाणात पोलिस व अधिकाऱ्यांवर दबाव येत असेल तर, परिस्थिती अवघड होणार आहे, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.

Ajit Pawar
मुख्यमंत्र्यांच्या होम पिचवर राडा; विचारे, दिघे अन् शिंदेंचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज!

पोलिसांवर राज्यातील जनतेचा विश्वास आहे. कोरोना काळात त्यांना चांगलं काम केलं, पोलीसांनी कठोर भूमिका घेतली होते तेव्हा लोकांनी पोलिसांचं ऐकलं. मात्र मागील चार महिन्यापासून राज्याची परिस्थिती पाहता, ती जर आता अशाच पद्धतीने असू नये, यासाठी स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालायला हवे,असेही पवार म्हणाले.

Ajit Pawar
CM Eknath shinde : 'शांघाई नाही, पण मुंबई स्वच्छ सुंदर बनवण्याचा आमचा प्रयत्न'

काही वेळा कठोर निर्णय हे घ्यावेच. काही वेळा सहकाऱ्याचं चुकत असेल, तर सांगावं की हे चुकतं आहे. मात्र आज तसं काही घडताना दिसत नाही, अशीच परिस्थिती कायम परिस्थिती राहिली तर महाराष्ट्राचं चित्र बिकट होईल, असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in