Shambhuraj Desai, Ajit pawar
Shambhuraj Desai, Ajit pawarsatara Reporter

शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात सुरू केलेला प्रकल्प अजितदादांनी राज्यात नेला...

जुलैमध्ये मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांच्या हस्ते या पथदर्शी Pilot Project उपक्रमाच्या कार्यप्रणालीचे उद्घाटन करण्यात आले होते.

मुंबई : महिला सुरक्षेचा आधुनिक दृष्टिकोनातून विचार करून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. साताऱ्यात या उपक्रमास मिळालेल्या यशामुळे आता हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.

महिला सुरक्षेसाठी अभिनव कार्यप्रणाली निर्माण करणारा आणि महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारा पथदर्शी उपक्रम गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पथदर्शी उपक्रमाच्या कार्यप्रणालीचे उद्घाटन करण्यात आले होते. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या उपक्रमाच्या काटेकोर अंमलबजावणीकडे विशेष लक्ष दिले होते. तसेच वेळोवेळी आढावा घेऊन पोलिस यंत्रणा आणि संबंधितांना प्रोत्साहन दिले. सातारा पोलिस दलाने पथदर्शी उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवला.

Shambhuraj Desai, Ajit pawar
जयंत पाटील हे कौतुक करतायत की टोमणे मारतायात, हेच शंभूराज देसाईंना कळेना!

महिलांसाठी असलेल्या कायदेविषयक जागृती, पोलिसी कार्यपद्धतीत सुधारणा आणि सामान्य महिलांना स्वसंरक्षणाचे धडे यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे. महिला व बाल अत्याचाराच्या घटनांमध्ये वेगाने तपास करणे, आरोपींना तातडीने अटक करणे, लवकर आरोपपत्र दाखल करणे, आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणे तसेच पिडीत महिला व बालकांना शासनाच्या योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे यासाठी सातारा पोलिस विभागाने गंभीरपणे पावले उचलली.

Shambhuraj Desai, Ajit pawar
मंत्री शंभूराज देसाई धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला...

त्याचबरोबर या उपक्रमाअंतर्गत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठीही पोलीस विभागाने नियोजन केले होते. साताऱ्यात पोलीस विभागाने या पथदर्शी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्याने सहा महिन्यांतच या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे हा उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नरत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राज्यभर राबविण्यास मान्यता दिली. त्याची घोषणा शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केल्याने आता प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाईल.

Shambhuraj Desai, Ajit pawar
अजित पवार सपोर्ट करत नाहीत.. बडे साब सब देख रहे है! : फडणविसांच्या आरोपांनी खळबळ

सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने १६ जुलै २०२१ पासून महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आतापर्यंत यातून पाचशेहून अधिक युवतींना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण, तर ३७ हजारांहून अधिक महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा, २००५ या कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे परिणाम जिल्ह्यात सकारात्मक दिसून आले आहेत.

Shambhuraj Desai, Ajit pawar
अजित पवारांनी पहिलीच मोठी घोषणा केली अन् सभागृहात संभाजी महाराजांचा जयघोष!

साताऱ्यात पोलिस विभागाने महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबवला. पोलिसांनी घेतलेल्या कष्टामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून महिला सुरक्षेच्या दृष्टीने तो महत्त्वपूर्ण ठरला आहे. हा उपक्रम आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाची उपयुक्तता सिद्ध केल्यामुळेच त्याची व्याप्ती वाढवण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यासाठी सातारा पोलिसांचे मी अभिनंदन करतो.

- शंभूराज देसाई (गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com