Aishwarya Rai Bachchan : सिन्नर तहसील कार्यालयाकडून ऐश्वर्या रॉय-बच्चनला नोटीस; काय आहे प्रकरण?

Aishwarya Rai Bachchan Got Notice: ऐश्वर्या रॉय-बच्चनने थकवला २२ हजार रुपयांचा कर
Aishwarya Rai Bachchan
Aishwarya Rai Bachchan Sarkarnama

Sinnar Tehsil News : अभिनेत्री ऐश्वर्या रॉयने-बच्चनने सिन्नरमधील जमिनीचा २२ हजार रुपयांचा कर थकवला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सिन्नर तहसील कार्यालयाकडून ऐश्वर्या रॉय-बच्चनला नोटीस बजावण्यात आली आहे.(Aishwarya Rai Bachchan got notice from sinnar tehsil)

थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी सिन्नरच्या तहसीलदारांनी तब्बल 1200 मालमत्ताधारकांना नोटीस बजावली आहे. यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनही असून ऐश्वर्या रायला नोटीस बजावण्यात आली आहे.

Aishwarya Rai Bachchan
Shiv Sena : खरी शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोर आज होणार फैसला

सिन्नरमधील जमिनीचा 22 हजारांचा कर थकवल्या प्रकरणी ऐश्वर्याला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता ऐश्वर्या राय-बच्चन काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळ ऐश्वर्या राय-बच्चन ऐश्वर्या राय यांची १ हेक्टर २२ आर जमीन आहे. त्या जमीनीच्या वर्षाच्या करापोटी २१ हजार ९७० रुपयांची थकबाकी आहे.

Aishwarya Rai Bachchan
Karad : सरपंचाचं लग्न ठरेना; मग काय, थेट केंद्रीय मंत्र्यांनाच घातले साकडे

तसेच येथील पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सुजलॉन कंपनीत अनेक नेते अभिनेत्यांची गुंतवणूक असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in