'मराठी तरुणांनो... जरा इकडे लक्ष द्या, अग्निपथ योजनेची संधी घ्या'

Agnipath Scheme|Retired Brigadier Hemant Mahajan| मराठी तरुणांना ही योजना म्हणजे मोठी संधी
Retired Brigadier Hemant Mahajan, Agnipath Scheme information in Marathi, Agneepath Yojana
Retired Brigadier Hemant Mahajan, Agnipath Scheme information in Marathi, Agneepath Yojana

पुणे : केंद्र सरकारने नुकतीच संरक्षण दलात अग्निपथ (AGNIPATH) योजनेची सुरुवात केली. पण बिहारसह देशात काही ठिकाणी तरुणांनी या योजनेला विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षांकडूनही संरक्षण दलाच्या या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. असे असतानाही अग्निवीरच्या भरतीत मराठी तरुणांनी सहभागी व्हावं, ही मराठी तरुणांसाठी मोठी संधी आहे, असे आवाहन निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मराठी तरुणांना केलं आहे. (Agnipath Scheme information in Marathi)

केंद्र सरकारने नुकतीच घोषणा केलेल्या संरक्षण दलात अग्निपथ (AGNIPATH) योजनेमुळे संरक्षण क्षेत्रात तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. अग्निवीर म्हणून काम करताना त्यातून आत्मसात केलेले कौशल्य आणि अनुभवामुळे तरुणांना भविष्यात विविध क्षेत्रात रोजगार मिळवून देणार आहेत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. मात्र, बिहारसह देशातील काही भागातील तरुणांनी योजनेला मोठा विरोध केला आहे. बिहारमध्ये आक्रमक तरुणांनी रेल्वे जाळली तर अनेक ठिकाणी सरकारच्या या योजनेविरोधात निदर्शनेही केली.

निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मात्र मराठी तरुणांना ही योजना म्हणजे मोठी संधी असल्याचे सांगत ग्निवीर या भरतीमध्ये मराठी तरुणांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे. अग्निपथ योजनेत फक्त चार वर्षाची नोकरी आहे. त्यामुळे सैन्याची क्षमता कमी होईल असं बोललं जात असलं तरी हा प्रश्न आपण आता लष्करप्रमुखांवर सोपवू. येत्या तीन महिन्यात अग्नीपथची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. ही नोकरी चार वर्षांची असली तरी चार वर्षानंतर 25 टक्के जवानांना लष्करी सेवेत सामावून घेतलं जाणार आहे. तर इतरांनाही केंद्रीय पोलीस दलात प्राधान्य दिलं जाईल.उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सरकारसह इतर राज्यांनीही त्या त्या सरकारी भरतीत या जवानांना प्राधान्य देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मराठी तरुणांनी अग्नीपथची तयारी करावी. देशाची अर्थव्यवस्था वाढत असली तरी नोकऱ्यांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे अग्निवीर भरतीत सहभागी व्हा, असं आवाहन हेमंत महाजन यांनी केलं आहे.

अशी आहे अग्निपथ योजना?

>> अग्निपथ योजनेच्या भरतीसाठी 17 ते 23 ची वयोमर्यादा आहे

>> उमेदवार 10 वी किंवा 12 वी पास हवा

>> चार वर्षांसाठी ही भरती असेल

>> चार वर्षांच्या सेवेनंतर कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केले जाणार

>> भरती झालेल्या जवानांपैकी 25 टक्के जवानांना लष्करी सेवेत सामावून घेतलं जाणार

अग्निपथ योजनेचे 8 महत्वाचे मुद्दे

अग्निपथ योजना ही देशातील सैन्यदल, हवाई दल आणि नौदल भरती करण्यासाठी संपूर्ण देशातील गुणवत्ता-आधारित भरती योजना आहे.

अग्निपथ योजनेअंतर्गत युवकांना देशाच्या सशस्त्र दलांमध्ये नियमित सेवेची संधी पुरवली जाणार.

अग्निपथ योजनेत जवानांची प्रशिक्षण कालावधीसह 4 वर्षांच्या सेवा कालावधीसाठी नोंदणी केली जाईल.

या योजनेमुळे शिस्तबद्ध आणि पारदर्शक निवड प्रक्रियेसह सर्वोत्कृष्ट निवडीद्वारे युद्धाची तयारी सुधारेल.

भरती झालेल्या जवानांपैकी 25 टक्के जवानांची चार वर्षानंतर नियमित केडरमध्ये निवड करणार

100% उमेदवारांना नियमित सेवेत नोंदणी करण्यासाठी स्वच्छेने अर्ज करण्याची मुभा

अग्निपथ योजनेत चौथ्या वर्षी ₹40,000 प्रति महिना अपग्रेडसह ₹30,000 प्रति महिना आकर्षक मासिक पॅकेज

4 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व जवानांना सेवा निधी संमिश्र आर्थिक पॅकेज.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com