Medical Officer : 10 हजार समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आज आंदोलन

Medical Officer Strike : पुन्हा एकदा रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता
Medical Officer
Medical Officer Sarkarnama

Medical Officer Strike : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपकेंद्रात समूदाय आरोग्य अधिकारीपदावर कार्यरत असणाऱ्या तब्बल 10 हजार समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज (16 जानेवारी) कामबंद आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

मार्ड डॉक्टरांचा संप मिटत नाही तोपर्यंत आता समूदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या सर्व समूदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात, यासाठी आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे. त्यांच्या या मागण्याकडे सरकारने लक्ष न दिल्यास बेमुदत आंदोलनाचाही इशाराही त्यांनी दिला आहे.

Medical Officer
Sanjay Raut News : दावोस दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांना राऊतांचं खुलं आव्हान ; 'तुमच्या नाकाखालून..'

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व समूदाय आरोग्य अधिकारी हे आपआपल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करणार आहेत. जवळपास दहा हजार समुदाय आरोग्य अधिकारी अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. मात्र, तरी देखील शासन त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Medical Officer
Nashik District Bank : मंत्री दादा भुसेंच्या घरावर शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा; नेमकं कारण काय?

दरम्यान, आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात समूदाय आरोग्य अधिकारी हे काम करत असतात. त्यांना शासकीय सेवेमध्ये कायम करावे, तसेच ब वर्गाचा दर्जा देण्यात यावा, त्याचबरोबर वेतन निश्चिती ३६ हजार रुपये करावी, बदल्यांबाबत देखील धोरण निश्चित करण्यात यावे अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. आता याबाबत राज्य सरकार (State Govt) काय निर्णय घेतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in