विद्यार्थी संघटना आक्रमक; मुंबई विद्यापीठाच्या जागेवरुन नवा वाद पेटणार?

Mumbai University |मुंबईतील बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.
Mumbai University |
Mumbai University |

मुंबई : मुंबईतील बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पार्किंगसाठी मुंबई विद्यापीठाची जागा देण्याचा निर्णय झाला होता. पण विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यात आता युवासेनेनेही उडी घेतली आहे. यामुळे आता पुन्हा राजकारण तापण्याची चिन्हे दिसून लागली आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील चित्रनगरी मैदान, नॅनो सायन्स जवळील मोकळी जागा आणि कुलगुरू निवासस्थानासमोरील मोकळी जागा वाहनतळसाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय झाला होता. मात्र या विरोधात युवासेनेने (Yuvasena) राज्यपालांकडे तक्रार केली आहे. यासोबतच राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आणि छात्र भारती संघटनेनेही विद्यापीठाची जागा पार्किंगसाठी देण्यास विरोध केला आहे.

Mumbai University |
उद्धव ठाकरेंना 1996 मध्ये मुख्यमंत्री व्हायचे होते : शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचा गौप्यस्फोट

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने शिंदे गटाचे कार्यकर्ते हे बीकेसी मैदानावर जमणार आहेत. पण विद्यार्थी संघटनांनी केलेल्या विरोधानंतर आता राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाच्या पार्किंगसाठी मुंबई विद्यापीठाची जागा वापरण्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेससह इतर विद्यार्थी संघटनांनी विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. युवासेनेने तर थेट यासंबंधी राज्यपालांकडेच तक्रार केली आहे. जागा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्किंगसाठी मुंबई विद्यापीठाची जागा देण्यास आमचा विरोध आहे. सर्व प्रभारी अधिकारी असल्यामुळे राजकीय दबावापोटी पोटी हे सुरु असल्याचा आरोपही युवासेनेने केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत राजकीय सभेला आणण्यात येणाऱ्या जनतेच्या बसेस पार्किंग करण्याची परवानगी विद्यापीठाचे कोणतेही प्राधिकरण अस्तित्वात नसताना कोणाच्या परवानगीने देण्यात आले याची चौकशी करण्यात यावी. परवानगी त्वरीत रद्द करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपणास अनेक पत्र दिलेला आहेत त्याचाही सकारात्मक विचार करुन विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी महामहिम राज्यपाल आणि महाराष्ट्र विद्यापीठे कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com