महाडिकांच्या विजयाने सदाभाऊंना आमदारकीची आशा; फडणवीसांची जादू पुन्हा चालणार?

Rajya Sabha | Vidhan Parishad | Congress | Sadabhau Khot : विधानपरिषदेला भाजप काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम करणार?
Sadabhau Khot News, Devendra Fadnavis News, Vidhan Parishad Election 2022 News
Sadabhau Khot News, Devendra Fadnavis News, Vidhan Parishad Election 2022 NewsSarkarnama

पिंपरी : राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी काल झालेल्या निवडणुकीचा आज पहाटे निकाल लागला. त्यात भाजपचे (BJP) राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळविण्याचा चमत्कार केला. पक्षाने प्रतिष्ठेची केलेली व संख्याबळानुसार निवडून येऊ न शकणारी तिसरी जागा निवडून आणली. आता ही जादू ते २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीतही करणार का याकडे आता लक्ष लागले आहे. (Rajya Sabha Election Latest News)

दरम्यान, राज्यसभा निवडणूक निकालामुळे उत्साह दुणावलेली भाजप विधानपरिषद निवडणुकीतही आता आपले सर्व पाच उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीला लागली आहे. एवढेच नाही, तर सहावे अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोतांना दिलेले समर्थनही ते कायम ठेवत महाविकास आघाडीला गॅसवरच ठेवण्याचे त्यांचे डावपेच आहेत.

विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार विधानपरिषदेला भाजपचे चार उमेदवार नक्की निवडून येणार आहेत. तरी त्यांनी पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पाचवा उमेदवार विजयी करण्यासाठी त्यांना २२ मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तरीही त्यांनी अपक्ष खोत यांना पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, राज्यसभेसारखा चमत्कार करून फडणवीस हे आपले पाच उमेदवार विजयी करून अपक्ष खोतांनाही विजयी करतात का आणि मविआला आणखी एक धक्का देतात का याकडे आता लक्ष लागले आहे. (Rajya Sabha Election Latest News)

राज्यसभेला भाजपचा तिसरा उमेदवार (धनजंय महाडिक) उमेदवार निवडून आला नसता, तर कदाचित विधानपरिषदेला ते थोडे बॅकफूटवर गेले असते. खोतांची उमेदवारी मागे घेऊन आपला पाचवा उमेदवार निवडून कसा येईल यावर त्यांनी भर दिला असता. मात्र, राज्यसभा निवडणूक निकालाने हे समीकरण आता पूर्ण उलटे झाले आहे. आता ते खोत यांनाही निवडून आणून मविआची आणखी कोंडी करण्याची शक्यता आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Rajya Sabha Election Latest News)

भाजपचा हा डाव यशस्वी झाला तर विधानपरिषदेला त्याचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी उभे केलेले दोन्ही उमेदवार निवडून येईल एवढे आमदार तथा मते त्यांच्याकडे नाहीत. त्यांच्या दुसऱ्या उमेदवाराचे भवितव्य पुन्हा एकदा अपक्षांच्या हाती आहे. मात्र याच अपक्ष आमदारांनी राज्यसभेला मविआला इंगा दाखवला आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेला त्यांच्यावर भरवसा ठेवणे आता परवडणारे नाही. (Rajya Sabha Election Latest News)

परिणामी विधानपरिषदेला भाई जगताप की चंद्रकांत हंडोरे यापैकी कोणाला पुरेशा मतांचा कोटा देऊन कॉंग्रेस सेफ करते आणि दुसरा कोण डेंजर झोनमध्ये राहतो, हे पाहण्यासारखे ठऱणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांचे विधानपरिषदेचे दोन्ही उमेदवार विजयी होऊ शकतात. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीचे चित्र येत्या सोमवारी (ता.१३) स्पष्ट होणार आहे. कारण उमेदवारी अर्ज माघारीचा तो शेवटचा दिवस आहे. २० तारखेला सकाळी ९ ते सायंकाळी ४ असे मतदान आहे. राज्यसभेप्रमाणेच मतदान संपताच संध्याकाळी पाच वाजता विधानपरिषदेचीही मतमोजणी सुरु होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in