Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांनाही धक्का

Sharad Pawar and Uddhav Thackeray : विरोधक आता काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sharad Pawar and Uddhav Thackeray
Sharad Pawar and Uddhav ThackeraySarkarnama

Sharad Pawar News : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांनाही मोठा दणका दिला होता.

Sharad Pawar and Uddhav Thackeray
Shahaji Bapu Patil News : ''संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गुंड..''; शहाजीबापूंचा पलटवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्ष ठाकरेंचा की शिंदेंचा हा वाद सुरू झाला होता. त्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात गेला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव दोन्हीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. त्यामुळे शिंदेंना दिलासा तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता.

यानंतर राज्यात मोठं राजकारण तापलं होतं. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शरद पवारांनाही मोठा दणका दिला आहे.

Sharad Pawar and Uddhav Thackeray
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

दरम्यान, यावर विरोधक आता काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केल्यामुळे याचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com