Karnataka Election Result: फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला; कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर पवारांचा भाजपला टोला

Karnataka Election Result 2023: मोदी है तो मुमकिन है! जनतेने नाकारलं; कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर शरद पवारांची भाजपवर जोरदार टीका
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Karnataka Election Result Live Updates: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट होत आलं आहे. कर्नाटकात काँग्रेसला जवळपास 133 जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला फक्त 67 जागा मिळताना दिसत आहे. जेडीएसला केवळ 21 जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या पार्श्वभूमीवरच बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला आहे. खोक्याचे आणि फोडाफोडीचे राजकारण हे लोकांना मान्य नाही", असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

Sharad Pawar
Karnataka Election Result 2023: काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; डी के शिवकुमार यांना अश्रू अनावर...

शरद पवार म्हणाले, "निपाणीत आमचा विजयासाठी प्रयत्न आहे. विजयाची खात्री नाही, पण राष्ट्रवादीला तेथे चांगला प्रतिसाद मिळाला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सभा घेऊन देखील त्यांना यश आलेलं नाही".

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जनतेचा रोष आहे. खोक्याचे आणि फोडाफोडीचे राजकारण हे लोकांना मान्य नाही. याच उत्तम उदाहरण हे कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे", असं ते म्हणाले.

Sharad Pawar
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; भाजपने गमावले दक्षिणेतील एकमेव राज्य...

"कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जनतेने सफसेल नाकारलं. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही. तेथे फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेचा गैरवापर भाजपने केला. कर्नाटकमध्ये देखील तीच अवस्था याआधी पाहायला मिळाली होती".

"आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, काँग्रेसला जवळपास 133 जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला फक्त 67 जागा मिळताना दिसत आहे. त्यामुळे भाजपला मिळणाऱ्या कलापेक्षा काँग्रेसला मिळणारा कल हा दुप्पट आहे. याचा अर्थ भाजपचा सफसेल पराभव करण्याची भूमिका जनतेने घेतलेली आहे", असं पवार म्हणाले.

Sharad Pawar
Karnataka Election Result : कर्नाटक निवडणुकीत जनतेने भाजपला भीक घातली नाही....पृथ्वीराज चव्हाण

"जाती धर्माच राजकारण लोकांना आवडत नाही. मोदी है तो मुमकिन है! जनतेने नाकारले, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपला खोचक टोला लगावला. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्रात देखील आगामी निवडणुका एकत्र लढल्यास नक्की यश मिळेल", असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

"आगामी 2024 च्या निवडणुकींमध्ये काय चित्र असेल, हे कर्नाटकने दाखवलं आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गटाने एकत्रीत निवडणुका लढवण्याबाबत मी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलणार आहे", असं म्हणत त्यांनी आगामी निवडणुका एकत्र लढवण्याबाबतचे संकेत दिले.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in