Maharashtra Politcs बारा खासदारांच्या पाठिंब्यानंतर उरलेल्या सात जणांच्या अडचणी वाढणार...

Shinde Government| Shivsena| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला काल (१९ जुलै) शिवसेनेच्या १२ खासदारांनीही पाठिंबा दिला.
Shinde Government| Shivsena|
Shinde Government| Shivsena|

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला काल (१९ जुलै) शिवसेनेच्या (Shivsena) १२ खासदारांनीही पाठिंबा दिला. या नंतर या खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेऊन शक्तीप्रदर्शन केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे या 12 खासदारांनी पत्र दिलं. या पत्रात राहुल शेवाळे यांची लोकसभेत गटनेता आणि भावना गवळी यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड व्हावी, अशी मागणी केली होती. ही मागणीही लोकसभाध्यक्षांनी मान्य केली.

ओम बिर्ला यांनी शेवाळे यांची गटनेतेपदी आणि भावना गवळी यांच्या प्रतोदपदाला मान्यता दिल्यामुळे शिवसेनेचे उरलेले 6 खासदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापुढे लोकसभेत भावना गवळी यांचा व्हिप शिवसेनेच्या या 6 खासदारांना मान्य करावा लागणार आहे. खासदार गवळी यांनी काढलेला व्हिप मान्य केला नाही तर त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्येही यावर भाष्य केलं होतं. शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांना आमचा व्हिप मान्य करावा लागेल, असं सांगत शिंदे यांनी एकप्रकारे इतर सहा खासदारांना इशाराच दिला होता.

Shinde Government| Shivsena|
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक: सर्वोच्च न्यायालयात ठरणार राजकारणाची दिशा

तसेच, लोकसभेत शिवसेनेचा गटनेता बदलल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे. लोकशाहीत त्यांना तो अधिकार आहे असे सांगताना शिंदे यांनी केंद्रीय मंत्रीपदावर दावा सांगण्याबाबत आता काही बोलणार नाही असी भूमिका घेतली. शिवसेनेच्या खासदारांनी केवळ लोकसभेतील गटनेते बहुमताने बदलले आहेत. पक्षाच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद भावना गवळी याच असून सेनेच्या साऱ्या खासदारांवर त्यांचा निर्णय बंधनकारक राहील, असाही इशारा मुख्यमंत्र्यांनी उर्वरीत 6 खासदारांना दिला.

शिंदे गटासोबत कोणते 12 खासदार

सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने, कृपाल तुमाने आणि भावना गवळी

शिवसेनेसोबत राहिलेले खासदार

विनायक राऊत, अरविंद सावंत, गजानन किर्तीकर, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, राजन विचारे आणि कलाबेन डेलकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in