शिंदे गटापाठोपाठ शिवसेनेच्याही टार्गेटवर मंत्री रविंद्र चव्हाण...

Shivsena : पूर्ण पुरावे गोळा करून रस्त्यावर उतरणार,असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला...
Dombiwali Shivsena
Dombiwali ShivsenaSarkarnama

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्ते कामाच्या निधीवरून शिंदे व फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाने देखील लक्ष केले आहे.

चव्हाण यांचे ते भाषण केवळ डोंबिवलीकरांची सहानुभूती मिळविण्यासाठी आहे. त्यांना खरोखरच काम करायचं होतं तर, ते साडे तीन वर्षे राज्यमंत्री होते, आता कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी ठोस पावले उचलली पाहिजेत तरच या डोंबिवलीमध्ये काहीतरी सुधारणा होईल. डोंबिवलीच्या बकाल अवस्थेला सर्वस्वी मंत्री चव्हाण हेच जबाबदार आहेत, असा थेट आरोप जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी मंत्री चव्हाण यांच्यावर केला आहे. (Dombiwali Shivsena Latest News)

Dombiwali Shivsena
पालकमंत्रीपद : कुणाला मिळणार कोणता जिल्हा ?

कल्याण डोंबिवली मध्ये एमएमआरडीएच्या वतीने जे रस्ते काम करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जी इतर कामे आहेत जसे पाईपलाईन, एमएससीबी ट्रान्सफॉर्मर ही कामे देखील रस्त्यांच्या कामाबरोबरच करण्यात यावी व त्यासाठी वाढीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याची माहिती देण्यासाठी डोंबिवली शिवसेना शाखेत आयोजित प्रतिकार परिषदेत जिल्हाप्रमुख थरवळ यांनी मंत्री चव्हाण यांच्यावर वरील आरोप केले. यावेळी शहरप्रमुख विवेक खामकर, मंगला सुळे, कविता गावंड, वैशाली दरेकर, सतीश मोडक यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख थरवळ यांनी भाजपचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. ते पुढे म्हणाले, चव्हाण यांना मंत्रिपद मिळाले त्याच्या शुभेच्छा दिल्यात. आता तरी त्यांनी डोंबिवली विधानसभा क्षेत्राकडे लक्ष द्यावे. डोंबिवली ची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे. 472 कोटी ते पुन्हा आणत आहेत निश्चित आणावे त्यांनी. पण त्याचबरोबर ती काम करून घेताना ती चांगल्या पद्धतीने कशी होतील याकडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर कितीही करोडो रुपये आले तरी त्याचा उपयोग नाही.

Dombiwali Shivsena
काय सांगता! मुख्यमंत्री शिंदेंचे डुप्लिकेट मानेंवर गुन्हा दाखल, कारण ऐकूण व्हाल हैराण...

फडणवीस सरकारने मंजूर केलेला निधी जर रद्द करण्यात आल होता तर विधानसभेत लक्षवेधी मांडायची होती. त्यांनी सांगावं की मी लक्षवेधी मांडली आणि त्यासंबंधी बोललो तरी लक्ष दिले नाही, मग आपण समजू शकलो असतो. डोंबिवलीच्या स्थितीला आमदार म्हणून चव्हाण हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. अल्पकालावधी मध्ये डोंबिवलीकरांनी त्यांना चांगली संधी दिली होती. पण दुर्दैवाने त्यांना डोंबिवलीसाठी काही करता आले नाही ही वस्तुस्थिती आहे,असा थेट हल्ला त्यांनी केला.

मी एक दोन वेळ प्रभागातील कामासाठी आमदारांकडे निधी मिळावा म्हणून पत्र लिहिली होती. पण तो काही मिळाला नाही ते सोडून द्या,असे म्हणत थरवळ म्हणाले की,आमचा आरोप कोणावर नाही. मात्र डोंबिवलीकरांची काम होणं आम्हाला गरजेचे आहे. जे यापूर्वी सत्तेत होते व आता जे कॅबिनेट मंत्री आहेत चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी वक्तव्य केले आहे. त्यांनी त्यावेळी खरेच फडणवीस सरकारकडून 472 कोटी मंजूर करून घेतले असतील तर त्याची कागदपत्रे, डीपीआर त्यांनी सादर करावा, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. उगाच हवेत बोलणारी आम्ही मंडळी नाही. आम्ही पूर्ण पुरावे गोळा करून याविषयी रस्त्यावर उतरणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com