Maharashtra Assembly : राहुल गांधींच्या माफीनाम्यावरुन विधानसभेत राडा ; सत्ताधारी-विरोधक भिडले

Maharashtra Assembly Budget 2023 : राहुल नार्वेकर यांनी दोन वेळा सभागृह स्थगित केले.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi News Sarkarnama

Maharashtra Assembly Budget 2023 : लंडन येथे भारताबाबत वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात संसदेत राडा झाल्यानंतर आता विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले. लोकशाहीविरोधात भाष्य करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी, यासाठी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सभागृहात खडाजंगी झाली.

राहुल गांधींच्या विरोधकात भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी चोर है म्हणत सभागृहात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद सुरु असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन वेळा सभागृह स्थगित केले.

Rahul Gandhi News
Ravikant Tupkar News: रविकांत तुपकरांनी शेअर केली 'एका लग्नाची गोष्ट' ; कोर्टाची पायरी चढली अन्..

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपशब्द वापरले. काश्मीरमध्येही त्यांनी वीर सावरकरांचा अपमान केला. यामुळे आम्ही राहुल गांधींची निंदा करतो, असं प्रताप सरनाईक यांनी सभागृहात मांडलं.

सभागृहात प्रश्नोत्तरांचा तास संपल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने सत्ताधाऱ्यांनी त्यांना अनुमोदन केलं. त्यानंतर सभागृहात राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Rahul Gandhi News
Himanta Biswa Sarma : बच्चू कडू अडचणीत ; माफी मागा, मुख्यमंत्र्यांनी खडसावले..

"भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. काश्मीरमध्येही त्यांनी वीर सावरकरांचा अपमान केला. यामुळे आम्ही राहुल गांधींची निंदा करतो," असे प्रताप सरनाईक म्हणाले.

"परदेशात जाऊन भारताविषयी बोलणं सहन केलं जाणार नाही. बाबासाहेबांनाही काँग्रेसने निवडणुकीत पाडलं होतं. या काँग्रेसने सावरकरांविषयही अपशब्द वापरले आहेत. शिवसेनाप्रमुखांनी सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी केली होती, त्या मागणीला तुम्ही चिटकून आहात का," असा प्रश्न संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.

Rahul Gandhi News
Pune News : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल ; भाजप कार्यकर्त्यांला मारहाण करण पडलं महागात...

शिरसाट म्हणाले, "मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला काँग्रेसने बिर्याणी चारली, त्याचा उदोउदो केला. पण सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. माहिममध्ये अतिक्रिमण केल्याचं समजताच मुख्यमंत्र्यांनी लागलीच ते अतिक्रमण हटवलं. या सभागृहात आम्ही राहुल गांधींविरोधात निषेधाचा ठराव मांडतो,

आमदार आशिष शेलार यांनी यावेळी संताप व्यक्त केला. शेलार म्हणाले, "भारत स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांच्या कर्तृत्वामुळे ज्यांच्या नावापुढे स्वातंत्र्यवीर लागलं त्यांचा अपमान राहुल गांधी यांनी केला. मनिषशंकर अय्यर यांच्याविरोधात पायातील जोडे काढून बाळासाहेबांनी जोडे मारले होते, पण आता सावरकरांचा अपमान केला जातोय, भारताचा अपमान केला जातोय, राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे. बाळासाहेब थोरात तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माफी मागा,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in