BMC च्या निवडणुकीत आघाडीची युती होणार? पवारांच्या बैठकीनंतर अजितदादा, जयंत पाटील ठाकरेंच्या भेटीला

Maharashtra Politics : या भेटीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय चर्चा होणार?
Jayant Patil,Uddhav Thackeray, Ajit Pawar
Jayant Patil,Uddhav Thackeray, Ajit Pawar Sarkarnama

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत आगामी विधान परिषद निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. तसेच, शिवसेना (Shivsena)- वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) युतीला विरोध नसल्याचेही राष्ट्रवादीकडून यावेळी सांगण्यात आले.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आज रात्री नऊ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीची उत्सुकता वाढली आहे. या भेटीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय चर्चा होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Jayant Patil,Uddhav Thackeray, Ajit Pawar
Sindhudurg : भाजप - शिवसेना भिडली; कणकवलीच्या कनेडी बाजारपेठेत तुफान राडा

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची (NCP) आढावा बैठक झाली. या बैठकीत आगामी विधान परिषद निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांवर विशेष भर देण्याची सूचना देण्यात आली.

तसेच, राज्यातील पक्षांतर्गत निवडणुका फेब्रुवारी महिन्यात घेण्यात याव्यात व इतर संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये, याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी इच्छा आणि सतर्कता जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Jayant Patil,Uddhav Thackeray, Ajit Pawar
Kolhapur : विरोधकांनी खिल्ली उडवलेल्या बास्केट ब्रिजचं भूमिपूजन धनंजय महाडिक गडकरींच्या हस्ते करणार

कसबा व चिंचवडबाबत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीनही पक्ष एकत्र बसतील आणि त्यावर निर्णय होईल. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल. वातावरण निर्माण करण्यासाठी मागण्या, घोषणा, ठराव करण्याचे कार्यक्रम सध्या भाजपकडून सुरू आहेत.

सध्या विरोधकांवर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न चिंचवडमध्ये भाजप (BJP) करत आहे. मात्र, खरी चौकशी तर पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची करायला हवी. त्याठिकाणी चौकशी केली तर भाजपचा किती भ्रष्टाचार आहे हे स्पष्ट होईल, असेही पाटील म्हणाले.

Jayant Patil,Uddhav Thackeray, Ajit Pawar
Chinchwad Constituency : चिंचवडचा उमेदवार पिंपरीत ठरणार; पण घोषणा दिल्लीत होणार

दरम्यान, पवारांसोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील आज रात्री नऊ वाजता उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. राज्यातील राजकीय परिस्थिती, येणाऱ्या निवडणुका, महाविकास आघाडी बाबत चर्चा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com