
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं. निवडणूक आयोगाने याबाबतचा निकाल शुक्रवारी (दि.17 फेब्रुवारी) दिला.
त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का बसला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले असल्याचे दिसले. त्यांनी आज मातोश्रीबाहेर येऊन शिवसैनिकांशी संवाद शाधला.
मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता ठाकरे गट आणि शिंदे गट सक्रिय झाले असून त्यांनी सोशल मीडियाच्या अकाउंटमध्ये काही बदल केले आहेत. दोन्ही गटांनी आपल्या सोशल मीडियाची नावे आणि चिन्हांमध्ये बदल केले आहेत.
ठाकरे गटाने काय बदल केले?
शिवसेनेच्या ट्विटर हँडलचे नाव आता एडीट करण्यात आलं आहे. आता त्यामध्ये 'ShivsSena-शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray' असा बदल करण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटाने आपल्या ट्विटरचा प्रोफाइल फोटो बदलत 'धनुष्यबाणा'च्या जागी मशाल या चिन्हाचा फोटो लावण्यात आला आहे.
शिंदे गटाने काय बदल केले?
तसेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील नेत्यांनी आपले प्रोफाइल बदलत धनुष्यबाणाचा फोटो ठेवला आहे. यामध्ये मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे या नेत्यांसह अजून काही नेत्यांनी फोटो बदलले आहेत.
दरम्यान, धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव शिंदे गटाला गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक आव्हान उभी ठाकली आहेत. तसेच शिंदेंनी बंड केल्यापासून उद्धव ठाकरे यांना धक्यावर धक्के बसत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या पुढील अडचणी मात्र, कमी होताना दिसत नाहीत. कारण आता ठाकरेंना निवडणूक आयोगाने दिलेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह राहणार का? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.