राज्यसभेनंतर विधानपरिषदेची रणधुमाळी; महाविकास आघाडीची धाकधूक वाढली

Vidhan Parishad Elelction 2022| येत्या २० जून रोजी राज्यात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे
Vidhan Parishad Elelction 2022  Latest news
Vidhan Parishad Elelction 2022 Latest news Sarkarnama

Vidhan Parishad Elelction 2022

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपच्या (BJP) धनंजय महाडिकांनी बाजी मारली. तर शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला. महाडिकांच्या या विजयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आखलेली खेळी यशस्वी ठरली. राज्यसभा निवडणूकीनंतर राज्यात आगामी २० जून रोज विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठीही भाजप- महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे.

राज्यसभेच्या निकालानंतर विधानपरिषदेसाठीही भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. पण विधानपरिषदेची मतदान प्रक्रियाही गुप्त पद्धतीने होणार असल्याने महाविकास आघाडीत चिंता वाढली आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणुक सुद्धा अटीतटीची होण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.

Vidhan Parishad Elelction 2022  Latest news
rajya sabha election result : राष्ट्रवादीनं शिवसेनेवर फोडलं पराभवाचं खापर

विधान परिषदेच्या निवडणूकीत १० जागांसाठी ११ जण रिंगणात असल्याने राज्यसभेप्रमाणेच चूरस बघायला मिळणार आहे. पण शिवसेनेने अनुभवी सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्याऐवजी सचिन अहिर व नंदुरबारचे जुने कट्टर शिवसैनिक आमशा पाडवी यांना संधी दिली आहे. तर राष्ट्रवादीने माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना विधान परिषद निवडणूकीच्या मैदानात उतरवले आहे.

तर भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेले राम शिंदे यांनाही भाजपने संधी दिली आहे. भाजपा प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष उमा खापरे आणि प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनाही भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही दुसऱ्यांना उमेदवारी दिली आहे. तसेच, प्रसाद लाड यांना पाचवे उमेदवार ठेवले आहे.

असे आहेत उमेदवार -

शिवसेना: सचिन अहिर, आमशा पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेस: रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे

काँग्रेस: चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप

भाजपा: प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com