Maharashtra Budget Session : कसब्यातील पराभवानंतर मुख्यमंत्र्यांचं ठरलं; म्हणाले...

CM Eknath Shinde : "सामान्य निवडणुकीत एकासएक नसतं"
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Maharashtra Politics : विधीमंडळात भाषण करताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना टोले मारण्याची एकही संधी सोडली नाही.

दरम्यान त्यांनी कसब्यातील परभावावरही भाष्य केले. ही पोटनिवडणूक होती. त्यात एका ठिकाणी जिंकलो तर एका हारलो. मात्र विधानसभेच्या सामान्य निवडणुकीत असे एकास एक होत नसते, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला २०२४ च्या निवडणुकीसाठी आव्हानच दिले.

पोटनिवडणुकीत (By Election) कसब्यातून काँग्रेसचा तर चिंचवडमध्ये (Chinchwad) भाजपचा उमेदवाराचा विजय झाला आहे. चिंचवडमध्ये बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसल्याचे विरोधक सांगतात. तर कसब्यात भाजपला धूळ चारल्याचा आनंद महाविकास आघाडी करीत आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले आहे.

Eknath Shinde
HSC Board Paper : बारावीचा पेपर फुटला, तक्रार दाखल : विरोधीपक्षनेते म्हणतात, 'पेपर फोडण्यात सरकारचा सहभाग?'

शिंदे म्हणाले, "राहुल गांधीनी (Rahul Gandhi) भारतभर रोड शो केला. मात्र पुर्वोत्तरमधील तिन्ही राज्यात काँग्रेस हारली तर भाजप जिंकली. कसबा पोटनिवडणूक हरलो तर सर्वसामान्यांनी हरविले असे म्हणता, मग चिंचवडमध्ये भाजपचा विजय दिसत नाही का? ही पोटनिवडणूक होती. कसब्यात ज्या चूका झाल्या त्या आमच्या लक्षात आल्या. बरं झालो यावेळेस हारलो. आता सर्वजण अलर्ट झालोय. आता या चुका परत होणार नाहीत."

पोटनिवडणुकीत झालेल्या चुका २०२४ मध्ये सामान्य निवडणुकीत सुधारण्याची संधी मिळाल्याचे शिंदे म्हणाले. यानंतर त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत (MVA) गोंधळ उडण्याची शक्यताही व्यक्त केली.

शिंदे म्हणाले, "आता सामान्य निवडणुकीत असे एकास एक होत नसते. तुम्ही तर तीन पक्ष आहेत. आम्ही २०१९ मध्ये महायुतीत (शिवसेना-भाजप) लढलो. आम्हाला काही प्रोब्लेम नाही. तुम्ही वेगवेगळे (आघाडी विरुद्ध शिवसेना) लढलेले आहात. एक पक्षाचा उमेदवार उभा राहला तर दुसरा काय भजन करत बसेल? बाबा तू निवडून ये मी तुझ्यासाठी पाच वर्षे थांबतो! असे होणार आहे का?"

Eknath Shinde
Soniya Gandhi : मोठी बातमी! काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली

कसबा निवडणुकीवरून शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही टोले लगावले. ते म्हणाले, "कसब्यात भाजप हरल्याचा खूप लोकांना एवढा आनंद झालाय की पेढे वाटतातय. टाळ्या वाजवतायत. आता काँग्रेस जिंकल्यामुळे ते खूश झाले आहेत. ते म्हणातात की आता राज्य जिंकू, देश जिंकू. पण तीन राज्य जिंकली त्याकडे त्यांचे लक्ष नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in