भाजपच्या आरोपानंतर, नॉट रिचेबल प्रताप सरनाईकांचं थेट राज्यपालांंना पत्र

'राज्यसरकारनं प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना करातून सुट दिल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
Pratap Sarnaik
Pratap Sarnaik

मुंबई : भाजपने (BJP) दोन दिवसांपूर्वी राणीच्या बागेत परदेशातून प्राणी आणण्याच्या निविदांमध्ये तब्बल १०६ कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. याच मुद्द्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केली होती. (Pratap Sarnaik latest news)

तसेच 'राज्यसरकारनं प्रताप सरनाईक यांना करातून सुट दिल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याप्रकरणी आपण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsing koshyari) यांची भेट घेणार असून लोकायुक्त आणि हायकोर्टातही दाद मागणार असल्याचेही चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सरनाईकांनी राज्यपालांकडे खुलासा पाठवला आहे.

Pratap Sarnaik
राज्यातील दोन मंत्र्यांच्या पत्नी माझ्या पक्षात यायला इच्छुक

या आरोपांनंतर आज प्रताप सरनाईक यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहीत खुलासा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आपण केवळ शिवसेनेचे आमदार असल्याने आपल्याविरोधात तक्रार केली जात असल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणात जातीने लक्ष्य घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

भाजप लोकप्रतिनिधींनी कश्या पद्धतीने महसूल बुडवला याची तक्रार सरनाईक यांनी आपल्या पत्रात केली आहे. त्याचबरोबर, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानने कांदळवनाची कत्तल केली. CRZ कायद्याचे उल्लंघन करून स्वछतागृह बांधल्याचा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे. तसेच भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी आपले घर SRA मध्ये दाखवून मोठे घर लाटले, महापालिकेचे स्विमिंग पूल BOT तत्वावर घेऊन पाणी चोरी करत असून भाजप नगरसेवक निधी मधून मेन्टेन करत असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

त्याचबरोबर त्यांच्या भावाची जिम अनधिकृत आहे तो महसूल बुडवत असल्याचं पत्रात आरोप आतापर्यंत भाजप प्रतिनिधींनी महसूल बुडवल्याची अनेक तक्रारी या पत्रात ,त्याला पुरावे जोडले आहे. तसेच, लोढा उद्योग समूह, टाटा उद्योग समूह तसेच मायकल जॅक्सन शी साठी विजक्राफ्ट संस्थेला सरकारने दंडमाफ केला होता. असंही त्यांनी आपल्या स्थानिक रहिवाशांसाठी संघर्ष करत असताना फक्त शिवसेना आमदार म्हणून माझ्याविरोधात तक्रार करत असल्याचंही त्यांनी म्हंटल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com