शिवसेनेच्या माजी नगरसेवकासाठी भाजप-मनसे मैदानात

अनधिकृत बांधकामे सोडून मंदिरावर कारवाई केली तर उद्रेक होणारच
शिवसेनेच्या माजी नगरसेवकासाठी भाजप-मनसे मैदानात

कल्याण : कल्याणमधील (Kalyan) मोहने परिसरातील जीर्ण झालेल्या जुन्या गावदेवी मंदिरांचा स्थानिक नागरिकांच्या वतीने सुरु होता. मात्र महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत (Rajesh Sawant) यांनी या मंदिराचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगत बांधकामावर कारवाई केली. यामुळे स्थानिकासंह भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनधिकृत बांधकामे सोडून मंदिरावर कारवाई करणार तर उद्रेक होणारच, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे.

या कारवाईनंतर माजी नगरसेवक मुकुंद कोट ( mukund Kot) यांनी प्रभाग कार्यालयात जात सहाय्यक आयुक्त सावंत यांना मारहाण केली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक मुकंद कोट आणि त्यांच्या पत्नी मनसे नगरसेविका सुनंदा कोट यांच्यासह 15 जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आता राजकारण तापलं आहे.

शिवसेनेच्या माजी नगरसेवकासाठी भाजप-मनसे मैदानात
योगींच्या खांद्यावर हात ठेवून मोदी काय सांगत होते? अखेर 'त्या' फोटोचा उलगडा झाला...

भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी मुकुंद कोट यांनी केलेल्या कृत्याला समर्थन दिले आहे. हिंदुत्व आणि मंदिरासाठी मुकुंद कोट यांची भूमिका फार महत्वाची असल्याने माझा त्यांना पाठिंबा आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनीही यावर भाष्य करत मंदिरावर केलेल्या कारवाई विरोधात राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

''दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी गावातील जीर्णोद्धार सुरु असलेले मंदिर तोडण्यात आले, सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. या परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरु आहेत, ती सोडून इतर ठिकाणी कारवाई केली तर नागरिकांचा उद्रेक होणारच, असा इशाराच राजू पाटील यांनी प्रशासन आणि राज्यसरकारला दिला. मुंबईत अनेक ठिकाणी सर्रासपणे अनधिकृत बांधकामे सुरु आहे. ती बांधकामे अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांना दिसत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याच वेळी त्यांनी ज्या अधिकाऱ्याने मंदीरावर कारवाई केली त्याने संपूर्ण गावाची आणि समाजाची माफी मागावी. नंतर आम्ही त्यांना कुठे बेकायदा बांधकाम सुरु आहेत, हे दाखवू. असे राजू पाटील यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.