MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव : रोहित पवारांचा खळबळजनक आरोप!

Rohit Pawar : भाजपवर थेट वार केल्याने, यावरून आतावाद उफाळून येण्याची शक्यता.

मुंबई : शिवसेनेत झालेली अभूतपुर्व बंडाळी आणि राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर भारतीय जनता पक्षाचा धसका सर्वच पक्षांनी घेतलेला दिसतो. विविध आमिष आणि ईडीचे धाक दाखवून इतर पक्षातील आमदारांना भाजप आपल्याकडे भरती करून घेत असल्याचा आरोप, विरोधकांडून सातत्याने केला जात होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. 'राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आहे,' असा आरोप पवार यांनी केला.

पवार म्हणाले, "भाजपने शिवसेना फोडली आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट फाडण्याचा भाजपचा डाव आहे." पवार यांनी भाजपवर थेट वार केल्याने, यावरून आतावाद उफाळून येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी फोडण्याचं भाजपचं डाव, भाजपचं पुढचं टार्गेट हे राष्ट्रवादी आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवारांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

MLA Rohit Pawar
शंभुराज देसाईंचा मोठा दावा : राष्ट्रवादीचे आमदार संध्याकाळी आमच्याकडे..

दरम्यान, नुकतेच राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. देसाई म्हणाले, जे आमदार अजित पवारांबरोबर आहेत, ते आमच्याकडे संध्याकाळी येतात, कोणकोण आमच्याकडे काम घेऊन येतो. तेवढं जरा मुख्यमंत्र्यांकडे विषय घेत चला सांगतात. मग आम्ही विचारतो, सगळं करू, पण काय आमच्याकडे येण्याचा विचार? वगैरे अशा गोष्टी होतात. असे देसाई यांनी म्हंटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com